Dhanteras 2024 
लाईफस्टाईल

Dhanteras 2024: धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं खरेदी करण्याचा शुभ मुर्हूत कोणता?

Dhanteras 2024: प्रदोष काळात भगवान धन्वंतरी यांच्यासोबत कुबेर आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. परिवारमध्ये समृद्धी यावी,लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळावा यासाठी या दिवशी सोन्याची खरेदी केली जाते.

Bharat Jadhav

धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर शुभ मुर्हूत जाणून घेणं आवश्यक आहे. यादिवशी सोन्याची खरेदी केली तर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद लाभत असतो. त्यामुळे शुभ मुर्हूत कोणता हे जाणून घेणं आवश्यक आहे. पंचांग भेदामुळे धनत्रयोदशी कधी आहे यावरून अनेकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. यावेळी धनतेरस २९ ऑक्टोबर २०२४ साजरी केली जाईल. कारण या दिवशी सकाळपासून ते रात्रभर खरेदी करण्याचा आणि पूजेचं शुभ मुर्हूत बनत आहे. धनतरेसला सोने-चांदी आणि भांडे खरेदी केलं जातं.

यादिवशी संध्याकाळी प्रदोष काळात भगवान धन्वंतरी यांच्यासोबत कुबेर आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. परिवारमध्ये समृद्धी यावी,लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळावा यासाठी धनत्रयोदशीच्या शुभ मुर्हूतावर सोन्याची खरेदी केली जाते.

धनत्रयोदशी २०२४ ला सोने खरेदी करण्याचा शुभ मुर्हूत

धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्यासाठी २९ ऑक्टोबर मंगळवारी सकाळी १०.३० ते ३० ऑक्टोबर ६.३२ वाजेपर्यंत शुभ मुर्हूत असेल. म्हणजेच काय सोने खरेदी करण्यासाठी तुम्हाला २० तास १ मिनिटांचा वेळ मिळेल. धनत्रयोदशीला सोने, चांदी, कार, घर, दुकानची खरेदी करत असतात. यासह झाडू, पितळाची भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी केली जाते

यावर्षी धनत्रयोदशीला त्रिपुष्कर योग तयार होत आहे. या योगात केलेल्या कामाचे तीन पट फळ मिळते असे मानले जाते. जर तुम्ही शुभ गोष्टी विकत घेतल्या तर ते तिप्पट वाढेल. तर तुम्ही व्यवसाय सुरू केल्यास तिप्पट नफा मिळण्याची शक्यता आहे.

त्रिपुष्कर योग - सकाळी ६.३१ - सकाळी १०.३१

धनत्रयोदशीच्या दिवशी कोणताही धातू खरेदी केला तर त्याला सौभाग्यचं प्रतीक मानलं जातं. सोनं हे लक्ष्मी मातेचं प्रतिक असतं. धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्याने घरात आर्थिक भरभराट येत असते. घरात लक्ष्मीचा कायम वास असतो. सोने खूप महाग असल्याने तुम्ही धनत्रयोदशीला बार्लीही खरेदी करू शकता. बालीही समृद्धीचं प्रतीक असतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Doctor Stress: डॉक्टरही असतात मानसिक तणावात! जाणून घ्या त्यामागची खरी कारणं

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Shravan Somwar: श्रावणाचा पहिला सोमवार: महादेवाला अर्पण करा या गोष्टी

Marathwada Politics : काँग्रेसला जोरदार धक्का, २ दिग्गज नेत्यांनी 'हात' सोडला, २४ तासांत कमळ हातात घेणार

PM Vishwakarma Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांचे लोन; PM विश्वकर्मा योजना आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT