desk job health risks GOOGLE
लाईफस्टाईल

Desk Job Risks: 8 तास डेस्क जॉब केल्याने तरुणांमध्ये वाढतोय 'हा' आजार, आताच करा हे बदल, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Back Pain Awareness: सलग ८-९ तास डेस्क जॉब केल्याने तरुणांमध्ये कंबरदुखी, मानदुखी आणि सांधेदुखी वाढते. तज्ज्ञांच्या मते योग्य पोस्चर, स्ट्रेचिंग आणि नियमित व्यायामाने गंभीर आजार टाळता येऊ शकतात.

Sakshi Sunil Jadhav

सध्या घाम गाळून खूप मेहनत करण्याची कामे करताना लोक पाहायला मिळत नाहीत. लोक चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊन चांगल्या ठिकाणी नोकरी करणं पसंत करतात. विशेषत: तरुण मंडळी ही यामध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात. ही मंडळी उच्च स्थानावर कॉर्पोरेटमध्ये ८ ते ९ तास काम करतात. हे काम करताना त्यांना शारीरिक श्रम किंवा जास्त हालचाल करावी लागत नाही. ही मंडळी हालचाल व्हावी म्हणून मोठ्या महागड्या जीममध्ये एका जागी बसून आलेला कंटाळा ताण घालवतात.

त्यात हे लोक खूप फीट राहण्यासाठी मेहनत घेत असतात. डाएट फॉलो करतात. पण बऱ्याचदा त्यांच्यामध्ये सांधेदुखीच्या समस्या वाढतात. पुढे आपण याच समस्यांवर उपाय जाणून घेणार आहोत.

सलग ८ ते ९ तास बसल्यावर तरुणांच्या आरोग्याला याचा गंभीर धोका होऊ शकतो. शरीर सतत खुर्चीवर बसून राहील्याने मणका, मान आणि सांध्यांवर मोठा ताण येतो, असं ऑर्थोपेडिक तज्ज्ञांचे मत आहे. विशेषत: २० ते ३० वयोगटातील तरुणांमध्ये कंबरदुखी, मानदुखी, खांदेदुखी आणि गुडघेदुखीच्या तक्रारी झपाट्याने वाढताना दिसत आहेत.

तज्ज्ञांच्या मते, बराच वेळ एकाच स्थितीत बसून राहिल्याने पाठीच्या कण्यावरील डिस्कवर जास्त दाब येतो. मान पुढे झुकवून लॅपटॉप किंवा मोबाईलकडे पाहण्याची सवय असल्यास ‘टेक नेक सिंड्रोम’सारखे विकार उद्भवू शकतात. चुकीच्या पोस्चरमुळे मांडीचे स्नायू घट्ट होतात, तर पोटाचे स्नायू कमकुवत होतात. यामुळे शरीराचा समतोल बिघडतो आणि मणक्याच्या वळणात बदल होऊ शकतो. दुर्लक्ष केल्यास स्लिप डिस्क, सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस किंवा सायटिका यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका असतो.

आरोग्य तज्ज्ञांनी कामाच्या वेळेत दर ३० ते ४५ मिनिटांनी उठून थोडी हालचाल करणं, स्ट्रेचिंग करणं, योग्य उंचीची खुर्ची वापरणं आणि स्क्रीन डोळ्यांच्या समांतर ठेवणे आवश्यक असल्याचं सांगितलं आहे. रोजच्या रोज हलका व्यायाम, योगासने आणि पाठीसाठी मजबूत करणारे व्यायाम केल्याने या समस्यांपासून मोठ्या प्रमाणात बचाव होऊ शकतो. तरुणांनी ‘चेअर लाइफ’कडे दुर्लक्ष न करता आत्तापासूनच सक्रिय जीवनशैली स्वीकारणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विलीनिकरणार कोणतीही चर्चा होणार नाही - प्रफुल्ल पटेल

Brain Strok Warning: ब्रेन स्ट्रोक कसा ओळखायचा? 'ही' लक्षणं झोपेत दिसतात, डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Shocking: बंजी जम्पिंग करताना तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, मानेचं हाड तुटलं नंतर...; थरारक VIDEO व्हायरल

Chandrakor Paithani Saree Blouse: चंद्रकोर पैठणी साडीवर ब्लाऊज कसा शिवायचा? हे आहेत 5 ट्रेडिंग पॅटर्न

Accident News : पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव डंपर घरावर कोसळला, २ महिलांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT