Symptoms Of Low Platelets Count saam tv
लाईफस्टाईल

Symptoms Of Low Platelets Count: डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स कमी होणं ठरू शकतं जीवघेणं; 'ही' लक्षणं दिसल्यास व्हा अलर्ट

Symptoms Of Low Platelets Count: गेल्या काही दिवसांमध्ये शहरात पुन्हा एकदा डेंग्यूचे रूग्ण सापडत असल्याचं समोर आलंय. प्लेटलेट्स कमी होण्याची नेमकी लक्षणं काय आहेत, ती जाणून घेऊया.

Surabhi Jayashree Jagdish

सध्याचं वातावरण पाहता अनेक आजार आपल्या मागे लागू शकतात. काही प्रमाणात पाऊस असल्याने डेंग्यू किंवा मलेरियासारखे गंभीर आजार होण्याचा धोका वाढला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शहरात पुन्हा एकदा डेंग्यूचे रूग्ण सापडत असल्याचं समोर आलंय. यामध्ये प्लेटलेट्स कमी होऊ लागतात.

तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, डेंग्यूचा ताप जीवघेणा देखील ठरू शकतो. त्यामुळे या आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याची नेमकी लक्षणं काय आहेत, ती जाणून घेऊया.

वेगाने कमी होतात शरीरातील प्लेटलेट्स

डेंग्यूचं निदान झाल्यानंतर रूग्णाच्या शरीरातील प्लेटलेट्सचा काऊंट वेगाने कमी होताना दिसतो. हे डेंग्यूच्या आजाराचं गंभीर लक्षण मानलं जातं. त्यामुळे डेंग्यूची लागण झाल्यानंतर प्लेटलेट्सच्या संख्येवर नजर ठेवणं गरजेचं असतं.

प्लेटलेट्स हे आपल्या रक्तात असणारे छोटी ब्लड सेल्स असतात. मुळात या ब्लड सेल्स आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत, मात्र त्यांचं महत्त्व भरपूर असतं. कोणत्याही प्रौढ किंवा हेल्दी व्यक्तीच्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या 1,50,000 ते 4,50,000 प्लेटलेट्स/ मायक्रोलीटर असते. ज्यावेळी रूग्णाला डेंग्यूची लागण होते, तेव्हा यांची संख्या कमी होऊ लागते.

प्लेटलेट्स कमी होण्याची लक्षणं

डेंग्यूची समस्या मच्छर चावल्याने होऊ शकते. यावेळी मच्छर चावल्यानंतर काही दिवसांत रूग्णाला ताप येतो. याशिवाय पुढे दिलेली लक्षणं रूग्णामध्ये दिसून येतात.

  • लघवीमध्ये रक्तस्राव होणं

  • उल्टी करताना रक्त प़डणं

  • नाक आणि हिरड्यांमधून रक्तस्राव होणं

  • अचानक थकवा येणं

  • तीव्र डोकेदुखी

  • जॉईंट्समध्ये वेदना होणं

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT