Daily Yog: एकाग्रता वाढवण्यासाठी करा वृक्षासन Saam TV
लाईफस्टाईल

Daily Yog: एकाग्रता वाढवण्यासाठी करा वृक्षासन

जमिनीवर सरळ सावधान स्थितीत उभे राहा. आता उजवा पाय उचलून तो गुडघ्यात वाकवून त्या पायाचे पाऊल डाव्या मांडीच्या खाली आणि गुडघ्याच्या वर ठेवावे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृक्षासन करताना शरीराची स्थिती ही एखाद्या स्थिर वृक्षाप्रमाणे होते. म्हणूनच या आसनाला वृक्षासन असे म्हणतात. या आसनामुळे शरीर, मन प्रफुल्लित होते आणि एकाग्रता वाढण्यात मदत होते. शरीरासोबतच मानसिक समतोल राखण्यासही मदत होते.

वृक्षासन कसे करावे?

जमिनीवर सरळ सावधान स्थितीत उभे राहा. आता उजवा पाय उचलून तो गुडघ्यात वाकवून त्या पायाचे पाऊल डाव्या मांडीच्या खाली आणि गुडघ्याच्या वर ठेवावे. अशा स्थितीत ताठ उभे राहावे. या स्थितीत डावा पाय ताठ ठेवावा आणि त्यावर शरीराचा तोल सांभाळावा. शरीर स्थिर झाल्यावर दीर्घ श्वास घेत हळूहळू दोन्ही हात डोक्यावर न्यावेत. दोन्ही हातांनी नमस्कारची मुद्रा करावी. पाठीचा कणा ताठ ठेवून श्वासावर आणि शरीराच्या स्थिरतेवर लक्ष ठेवावं. यानंतर श्वास सोडत हात खाली घ्यावेत. उजवा पाय खाली आणावा आणि आता डावा पाय उजव्या पायाच्या मांडीजवळ नेत हे आसन करावे.

वृक्षासन करण्याचे फायदे कोणते?

- शरीराची स्थिरता आणि समतोल राखणारी यंत्रणा सुधारण्यास मदत करते.

- एकाग्र आणि सतर्क राहण्याची वृत्ती वाढवते.

- खांदे आणि पाठीच्या कण्यासाठी हे उत्तम आसन आहे.

- पाय मजबूत करते आणि कमरेखालील भाग मोकळा होतो.

- श्वासोच्छवासाची क्षमता वाढवते.

- चेतातंतू आणि स्नायू यांच्यातील समन्वय वाढवण्यास मदत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CBSE Class 12 Result 2026: बारावीचा निकाल कधी लागणार? मोठी अपडेट समोर; मोबाइलवर रिझल्ट कसा पाहाल?

Maharashtra News Live Update: नंदूरबार जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे धरणांतील पाणीसाठात झपाट्याने घट

Bigg Boss Marathi 6: 'मला राकेश बापटच्या मुलांची आई व्हायचंय...'; राखी सावंतचं व्यक्त केली धक्कादायक इच्छा

Genelia Deshmukh Photos: 'माझ्या हृदयाचा ठोका...!' जेनेलियाचे फोटो पाहून रितेश देशमुख झाला 'प्रेमात वेडा', म्हणाला....

Pune Railway Station: स्लिपींग पॉड्स, AC लाउंज, वाय-फाय अन् बरंच काही; पुणे रेल्वे स्टेशनवर फक्त ४० रुपयांत राहायची सोय

SCROLL FOR NEXT