Mother's Day Special  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Mother's Day Special : आईसोबत तुमचे नाते असे घट्ट करा..!

आज ८ मे जगभरात मातृदिन साजरा केला जाईल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आई ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आई (Mother) आणि मुलाचे आयुष्य इतकं गुंफलेलं असतं की, कितीही अडचणी आल्या तरी आई प्रत्येक पात्रात स्वत:ला सामावून घेत असते. मग ते पात्र कोणतही असो शाळेतील शिक्षकाचे, मार्गदर्शकाचे किंवा चांगल्या मित्राचे. यामुळेच आईचा भावनिक आधार मुलाला नेहमी पुढे जाण्यास प्रेरित करतो आणि एक चांगला माणूस बनण्यास मदत करत असतो. आज ८ मे जगभरात मातृदिन साजरा केला जाईल. यादिनानिमित्त तुम्ही तुमच्या आठवणींना उजाळा देऊन आईसोबत असणारे तुमचे नाते अधिक घट्ट करू शकता.

हे देखील पहा -

तुमच्या आणि तुमच्या आईच्या नात्यात कुठेतरी दुरावा आला असेल तर 'मदर्स डे'च्या निमित्ताने तुम्हीही तुमच्या आईशी पुन्हा घट्ट नाते विणू शकता. कसे ते जाणून घेऊया.

आईला असे खुश ठेवा.

१. तुमच्या आठवणींना उजाळा द्या -

कधीकधी आईसोबत जुन्या चांगल्या आठवणी शेअर करणे खूप प्रभावी ठरते. यासाठी तुम्ही तुमचे काही जुने फोटो (Photo) बघत तुमच्या आठवणींना उजाळा द्या.

२. कामात मदत करा -

तुमच्या आईने कामासाठी नकार दिला तरी तुम्ही तिला मदत करा आणि मदतीसाठीही विचारा. तुमची आई सुरुवातीला नकार देई ,परंतु जेव्हा तुम्ही तिची मदत कराल तेव्हा तिला आनंद होईल. जर तुम्ही दूर राहत असाल, तर फोनवर किंवा तुम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टींबद्दल नक्कीच मदत मागा आणि शक्य तितक्या लवकर पूर्ण करा.

३. आईसाठी वेळ काढा -

आयुष्य कितीही व्यस्त असले तरी तुम्ही तुमच्या आईसाठी खास वेळ (Time) काढायला हवा. आठवड्यातून एक दिवस शॉपिंग, डिनर, नाश्ता किंवा मूव्ही इत्यादीसाठी आवश्यक योजना बनवा असे केल्याने तुम्ही एकत्र वेळ घालवू शकता.

४. काळजी घ्या -

आईला नेहमी जाणवून द्या की तुम्ही नेहमीच तिच्यासोबत आहात, तिला गरज असेल तेव्हा तुम्ही कुठूनही तिला मदत कराल. असे केल्याने तिला कधीही एकटेपणा जाणवणार नाही.

५. तिलाही अपडेट ठेवा -

सध्याच्या डिजिटलायझेशनच्या युगात तांत्रिक ज्ञान ही काळाची गरज बनली आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आईला ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाइन बिल पेमेंट, बँकिंग इत्यादींविषयी माहिती द्या आणि तिची अपडेट राहायला मदत करा.

अशाप्रकारे तुम्ही तुमच्या आईसोबत नाते घट्ट विणू शकता.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवारांच्या निवासस्थानी मोठा जल्लोष

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले मतदारांचे आभार

Jasprit Bumrah: ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव? बुमराहवर फेकी बॉलिंगचे आरोप! सोशल मीडियावर पेटला वाद

Vidhan Sabha Election Result : खडसेंना धक्का; शिंदे शिवसेनेची जागा कायम

SCROLL FOR NEXT