Lumpy Virus Saam TV
लाईफस्टाईल

Lumpy Virus : थांबा ! लम्पी आजार झालेल्या गायीचे दूध पितायं? तर आधी हे वाचा

माणसांमधले अनेक रोग हे प्राण्यांमधून पसरतात. स्वाइन फ्लू किंवा चिकन पॉक्स सारख्या प्राण्यांच्या माध्यमातून बहुतेक विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतात.

कोमल दामुद्रे

Lumpy Virus : नुकत्याच कोरोनाचे (Corona) वाढते प्रमाण कमी झाल्यानंतर लम्पीसारख्या आजारांने आपले डोके वर काढले आहे. माणसांमधले अनेक रोग हे प्राण्यांमधून पसरतात. स्वाइन फ्लू किंवा चिकन पॉक्स सारख्या प्राण्यांच्या माध्यमातून बहुतेक विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतात.

हल्ली गायींमध्ये चर्मरोग पसरण्याची प्रकरणे समोर येत आहेत. या काळात दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे सुरक्षित आहे का? हे जाणून घेऊया.

लम्पी विषाणू वेगाने पसरत आहे. अशा परिस्थितीत, हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे की गायीपासून मानवांवर परिणाम होऊ शकतो का? तसेच, गायींना हा आजार होत असल्यास दुग्धजन्य पदार्थ वापरणे कितपत योग्य आहे हे जाणून घेणेही आवश्यक आहे.

लम्पी रोग म्हणजे काय?

हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे जो प्राण्यांना प्रभावित करतो. त्वचेचा रोग असून याचा परिणाम हा गायींवर होत आहे. यामुळे त्यांच्या त्वचेवर गुठळ्या किंवा फोड येऊ शकतात. प्रकृती गंभीर झाल्यास मृत्यूही होऊ शकतो. विशेषत: ज्या प्राण्यांना यापूर्वी विषाणूचा संसर्ग झालेला नाही.

त्यामुळे संक्रमित जनावरांचे दूध किंवा चीज घेणे सुरक्षित आहे का?

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, दूध उकळल्यानंतर किंवा उकळल्याशिवाय त्याच्या गुणवत्तेत कोणतीही अडचण येत नाही. तुम्ही कोणत्याही दुग्धजन्य पदार्थाचे सेवन करू शकता. या प्रकरणात, संक्रमित गुरांचे दूध घेणे सुरक्षित आहे.

पण तरीही तुम्ही दूध (Milk) उकळल्यानंतरच ते पिण्यास योग्य ठरेल. तुम्ही दूध-दही किंवा पनीर खाण्याचा प्रयत्न करत असाल, तर काळजी घ्या. लम्पी विषाणूच्या संपर्कात आलेल्या कोणत्याही प्राण्याचे कोणतेही दुग्धजन्य पदार्थ खाल्ले जाऊ शकतात पण, शिजवल्यानंतरच खा.

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही प्लांट बेस्ड पनीरच्या पर्यायाचाही विचार करू शकता. स्वच्छतेची विशेष काळजी घ्या आणि डेअरी किंवा संक्रमित जनावरांच्या संपर्कात आल्यावर हॅन्ड सॅनिटायझर वापरा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काळजाचा थरकाप! प्रशासनाची बंदी झुगारून धबधब्यावर 17 जणांची हुल्लडबाजी; पुण्याचे दोन पर्यटक बुडाले

Thane Tourism : ठाण्याच्या जंगलात लपलाय सुंदर धबधबा, सौंदर्य पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Crime News : मुलीजवळ आला पॅन्टची चैन उघडली अन्...; बसमध्ये तरुणाचं किळसवाणं कृत्य

Maharashtra News Live Update: माणगावच्या देवकुंड धबधब्यात दोन पर्यटक बुडाले

Crime News: जबरदस्ती रुममध्ये शिरला, नंतर प्रायव्हेट पार्ट दाखवून...; बेंगळुरूमध्ये डिलिव्हरी एजंटकडून तरुणीशी अश्लील वर्तन

SCROLL FOR NEXT