Diabetes And Kidney Health saam tv
लाईफस्टाईल

Kidney Health: जास्त बसून वेळ टीव्ही पाहिल्याने किडनी होतेय खराब? नव्या संशोधनातून धक्कादायक खुलासा

Diabetes And Kidney Health: तासन्‌तास टीव्ही पाहण्याची सवय किडनीच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते का? नव्या १२ वर्षांच्या संशोधनातून किडनीच्या कार्यक्षमतेशी त्याचा संबंध समोर आला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

दिवसभरातील कामाचा थकवा घालवण्यासाठी अनेकजण फ्री टाईममध्ये टीव्ही पाहणं पसंत करतात. मनोरंजनासाठी टीव्ही पाहणं चांगलं असलं तरी तासन्‌तास टीव्हीसमोर बसून राहणं हे तुमच्या आरोग्यासाठी फार आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. एका नव्या संशोधनातून जास्त वेळ टीव्ही पाहणाऱ्या लोकांच्या किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता समोर आलीये.

टाइप-२ डायबिटीस असलेल्या लोकांना याचा अधिक धोका असल्याचं संशोधनात दिसून आलंय. हे संशोधन Scientific Reports या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालंय. ऑस्ट्रेलिया, जपान आणि ब्रिटनसह अनेक देशांतील शास्त्रज्ञांनी या संशोधनात सहभाग घेतला.

१२ वर्षे करण्यात आला अभ्यास

जास्त वेळ टीव्ही पाहण्याचा किडनीच्या आरोग्यावर काय परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी हा अभ्यास केला. यामध्ये जवळपास १२ वर्षे लोकांच्या किडनीच्या कार्यक्षमतेत होणारे बदल तपासण्यात आले. या काळात जे लोक रोज जास्त वेळ टीव्ही पाहत होते त्यांच्या किडनीच्या काम करण्याच्या क्षमतेत घट झाल्याचं दिसून आलंय. या लोकांच्या किडनीच्या तपासण्या केल्यानंतर काही महत्त्वाचे रिपोर्टही योग्य नसल्याचं दिसून आलं.

डायबिटीसच्या रुग्णांनी अधिक काळजी घ्यावी

या संशोधनात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. ज्या लोकांना टाइप-२ डायबिटीस आहे, त्यांच्यामध्ये जास्त वेळ टीव्ही पाहणं आणि किडनीच्या कार्यक्षमतेत घट होणं यांचा संबंध अधिक दिसून आला.

डायबिटीसचा परिणाम फक्त रक्तातील साखरेवर होत नाही तर त्याचा किडनीवरही परिणाम होऊ शकतो. रक्तातील साखरेचं प्रमाण दीर्घकाळ जास्त राहिल्यास किडनीला नुकसान पोहोचू शकतं. त्यामुळे हळूहळू किडनीची रक्तातील घाण आणि अतिरिक्त पाणी गाळण्याची क्षमता कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत डायबिटीस असलेली व्यक्ती दिवसभर एकाच जागी बसून राहत असेल तर तिने आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेणं गरजेचं आहे.

जास्त वेळ टीव्ही पाहण्याचा किडनीवर परिणाम कसा होतो?

अनेक तास टीव्ही पाहताना आपण एकाच जागी बसून राहतो. यामुळे शरीरातील रक्तप्रवाहाचा वेग कमी होऊ शकतो. त्याचप्रमाणे वजन वाढण्याची शक्यताही असते. या दोन्ही गोष्टींचा परिणाम किडनीच्या कामावर होऊ शकतो.

पण या संशोधनातून जास्त वेळ टीव्ही पाहणं आणि किडनीच्या कार्यक्षमतेत घट होणं यांच्यात संबंध असल्याचं दिसून आलं आहे. टीव्ही पाहिल्यामुळेच थेट किडनी खराब होते असं या संशोधनातून सिद्ध झालेलं नाही.

किडनी निरोगी ठेवण्यासाठी काय करावं?

किडनीचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी रोजच्या जीवनात काही छोट्या सवयी लावून घेणं गरजेचं आहे

  • टीव्ही पाहताना मध्येच उठून थोडं चालावं

  • दररोज किमान ३० मिनिटं चालण्याची सवय लावावी

  • बराच वेळ एकाच जागी बसून काम करू नयं

  • रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवावा

  • या छोट्या सवयींमुळे शरीर निरोगी ठेवण्यास मदत होऊ शकते

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmer Relief : मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या खात्यावर आणखी २ हजार जमा होणार, तारीखही ठरली?

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यावर हल्ल्याचा कट! पोलिसांनी दोघांना केली अटक; बिग बींची गूढ पोस्ट चर्चेत

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये आजपासून ३ दिवस पाणीपुरवठा बंद

Mumbai News: मुंबईमध्ये लेखा अधिकाऱ्याला अटक, लाच घेताना ACB ने रंगेहाथ पकडलं

Konkan Forts : कोकणातील जलदुर्गांचा थाटच न्यारा! हिवाळ्यात आवर्जून फिरा मराठ्यांच्या शौर्याची साक्ष देणारे ६ भव्य किल्ले

SCROLL FOR NEXT