Control High Blood Pressure Saam Tv
लाईफस्टाईल

Control High Blood Pressure : तुमचंही ब्लडप्रेशर कमी होत नाही? घरगुती उपाय करून पाहा, झटक्यात त्रास छुमंतर

Causes Blood Pressure : सोडियम शरीरातील रक्तदाब आणि रक्ताचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Home Remedies For Blood Pressure : तुमच्यासोबत कधी ना कधी असे घडलेच असेल, जेव्हा तुम्ही तुमची आवडती वस्तू खातात आणि त्यात मीठ कमी झाले तर त्या पदार्थाची सारी चवचं संपते. मीठ अन्नात खूप महत्त्वाची भूमिका बजावते.

मीठ ही अशी गोष्ट आहे जी अन्नाच्या सर्व चवींना बांधून ठेवते. मीठ सोडियमचा सर्वात सामान्य स्त्रोत आहे. अन्नाची चव वाढवण्याव्यतिरिक्त सोडियम बायकार्बोनेट आणि मोनोसोडियम ग्लूटामेटमध्ये देखील सोडियम आढळते. सोडियम शरीरातील रक्तदाब आणि रक्ताचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त सोडियम मसल्स आणि नर्वस फंक्शनमध्येही महत्वाची भूमिका निभावतो.

पण ज्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन आरोग्यासाठी (Health) हानिकारक ठरू शकते, त्याचप्रमाणे सोडियमचे प्रमाणही शरीराला हानी पोहोचवू शकते. जास्त प्रमाणात सोडियमचे सेवन केल्याने मूत्रात कॅल्शियमचे प्रमाण वाढते, ज्यामुळे तुम्हाला किडनीशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. याशिवाय शरीरात सोडियमचे प्रमाण जास्त असल्याने ऑस्टिओपोरोसिसचा धोकाही वाढतो. ऑस्टियोपोरोसिस हा हाडांचा आजार आहे ज्यामुळे फ्रॅक्चरचा धोका वाढतो.

शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी करून रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करता येतो. शरीरातील सोडियम कमी करण्याचा उत्तम उपाय म्हणजे जास्त प्रमाणात सोडियमयुक्त पदार्थांचे सेवन कमी करणे आणि त्याऐवजी अशा पदार्थांचे सेवन करणे ज्यामध्ये सोडियमचे प्रमाण खूपच कमी असते, तसेच या गोष्टी आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरतात. . चला या गोष्टींबद्दल जाणून घेऊया -

सफरचंद -

फळांमध्ये नैसर्गिकरित्या सोडियम कमी आणि पोटॅशियम जास्त असते. सफरचंदात सोडियमचे प्रमाण खूपच कमी असल्याचे आढळून आले आहे. सफरचंदमध्ये चरबीचे प्रमाण कमी असते आणि ते व्हिटॅमिन सी आणि फायबरचा चांगला स्रोत आहे. सफरचंद (Apple) आणि इतर फळांमध्ये आढळणारे पॉलिफेनॉल हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

काकडी -

काकडी ही आरोग्यासाठी खूप आरोग्यदायी मानली जाते कारण त्यात कॅलरीज, सोडियम आणि फॅट जवळजवळ नसते. एक कप काकडीत 3 ग्रॅम सोडियम असते, ज्यामुळे तुम्ही ते मुक्तपणे सेवन करू शकता. काकडीत पाण्याची पातळी खूप जास्त असते ज्यामुळे ती शरीराला डिहायड्रेट होऊ देत नाही.

बदाम -

बदाम हेल्दी स्नॅक मानले जातात. 100 ग्रॅम बदामामध्ये 1 मिलीग्राम सोडियम आढळते. बदामामध्ये अनेक पोषक आणि अँटिऑक्सिडंट्स आढळतात. व्हिटॅमिन (Vitamins) ई, मॅग्नेशियम, प्रथिने, जस्त इत्यादी बदामामध्ये आढळतात. बदाम शरीरातील रक्तातील साखरेची पातळी, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. बदाम खाल्ल्याने भूक कमी होते, ज्यामुळे वजन कमी होण्यास खूप मदत होते.

लिंबाचा रस आणि औषधी वनस्पती -

जेवणात मीठाऐवजी लिंबाचा रस आणि औषधी वनस्पती वापरून सोडियमचे प्रमाण कमी करू शकता. यासोबत लोणचे, पापड, खारवलेले बिस्किटे, सॉल्टेड बटर, चीज इत्यादी जास्त सोडियमयुक्त पदार्थ खाणे टाळावे. आहारात बदल करण्यासोबतच रोज व्यायाम करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

होम लोन, कार लोन झालं स्वस्त; नवरात्रीआधी 'या' बँकेने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Live News Update : उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; मतदान प्रक्रियेला सुरुवात

iPhone 17 Series launch: खास डिझाइन, आकर्षक फिचर्स, iPhone 17 आज येतोय, किंमत किती असणार? VIDEO

Kajal Aggarwal : काजल अग्रवालच्या मृत्यूची अफवा, नेमकं काय आहे सत्य?

Zilha Parishad School : झेडपीच्या शाळेचा चेहरामोहरा बदलला, दौंडमधील मेमानवाडीच्या शाळेची जोरदार चर्चा, मुलं जर्मन बोलतात... वाचा

SCROLL FOR NEXT