Parenting Tips Saam tv
लाईफस्टाईल

Parenting Tips : पालकत्वाचा प्रवास सुखकर करण्यासाठी कन्सल्टिंग ठरेल फायदेशीर, तज्ज्ञांनी दिला सल्ला

Therapy Good For Parents : पालकत्वाचा प्रवास हा जीवनातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. बदलणाऱ्या जीवनशैलीनुसार हा प्रवास सुरळीत आणि निरोगी होण्यासाठी गर्भधारणापूर्व समुपदेशन अतिशय महत्त्वाचे ठरते.

कोमल दामुद्रे

Consulting Will Help Better Parenting :

पालकत्वाचा प्रवास हा जीवनातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. बदलणाऱ्या जीवनशैलीनुसार हा प्रवास सुरळीत आणि निरोगी होण्यासाठी गर्भधारणापूर्व समुपदेशन अतिशय महत्त्वाचे ठरते. हे जोडप्यांना त्यांच्या पालकत्वाच्या प्रवासात कसे फायदेशीर ठरते याविषयीची माहिती या लेखाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

पुण्यातील वंध्यत्व निवारण तज्ज्ञ, नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीच्या डॉ. भारती ढोरेपाटील यांनी सांगितले की, गर्भधारणेची योजना आखत असलेल्या जोडप्यांना मार्गदर्शनासाठी डिझाइन केलेली एक विशेष आरोग्य (Health) सेवा आहे. यात गर्भधारणेपूर्वी जोडप्यांचे आरोग्य, जीवनशैली आणि वैद्यकीय इतिहासाचे मूल्यांकन केले जाते. भविष्यात आईच्या (Mother) आरोग्यावर, विकसनशील गर्भावर किंवा एकूणच गर्भधारणेवर परिणाम करणारे संभाव्य धोके किंवा घटक ओळखून ते दूर करण्यासाठी समुपदेशन प्रक्रिया महत्त्वाची ठरते.

1. समुपदेशनाचे प्रमुख घटक:

1. वैद्यकीय इतिहास मूल्यमापन: दोन्ही जोडप्यांच्या वैद्यकीय इतिहास जाणून घेणे, अनुवांशिक घटक किंवा प्रजनन समस्या ओळखण्यात मदत होते ज्यामुळे भविष्यातील गर्भधारणेवर परिणाम होऊ शकतो.

2. आहाराविषय मार्गदर्शन: गर्भधारणेदरम्यान संतुलित आणि पौष्टिक आहाराचे (Food) सेवन करणे आवश्यक आहे. योग्य पोषण केवळ संपूर्ण आरोग्यासाठीच नाही तर गर्भाच्या विकासातही महत्त्वाची भूमिका बजावते. योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारच्या अन्नाचे सेवन करणे, ताजा आणि सकस आहार घेणे महत्त्वाचे आहे.

3. जीवनशैलीत बदल: समुपदेशनामध्ये जीवनशैली संबंधीत घटकांवर चर्चा केली जाते जसे की धूम्रपान, मद्यपान आणि विविध औषधांचा वापर. निरोगी जीवनशैलीचा अवलंब केल्याने गर्भावस्थे दरम्यानचा प्रवास सुरळीत होतो.

4. जोखीम घटकांचे व्यवस्थापन: संभाव्य जोखीम घटक, जसे की दीर्घकालीन वैद्यकीय परिस्थिती किंवा गर्भधारणेसाठी धोका निर्माण करणारी औषधे ओळखुन त्याचे व्यवस्थापन केले जाते.

5. लसीकरण स्थिती: दोन्ही भागीदार लसीकरणाबाबत अद्ययावत असल्याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. काही संक्रमणांचे गर्भधारणेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात, त्यामुळे योग्य लसीकरण राखणे हा गर्भधारणापूर्व काळजीचा भाग आहे.

6. मानसिक आणि भावनिक आरोग्य: समुपदेशन कोणत्याही मानसिक आरोग्यविषयक चिंता, ताणतणाव किंवा जोडप्याच्या गर्भधारणेसंबंधी प्रवासावर परिणाम करतात . ‍या भावनिक घटकांचे निराकरण करण्यासाठी एक समुपदेशन प्रभावी ठरते.

2. पालकत्वासाठी काही महत्त्वाच्या बाबी

1. योग्य वेळ ठरविणे शक्य: आरोग्याविषयी आणि संभाव्य जोखमींबद्दलच्या ज्ञानाने जोडप्यांनी गर्भधारणा केव्हा करावी याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेता येतो, तसेच शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या तयारी करता येते.

2. फायदेशीर ठरते- संभाव्य धोके कमी करण्यासाठी आणि निरोगी गर्भधारणेसाठी अनुकूल वातावरण तयार करण्यास समुपदेशनाचा नक्कीच फायदा होतो.

3. वेळीच हस्तक्षेप: लवकरात लवकर कोणतेही जोखमीचे घटक ओळखून त्यावर प्रभावी उपाय केल्याने वेळीच हस्तक्षेप करता येऊ शकतो. यामुळे यशस्वी गर्भधारणेची शक्यता वाढते.

4. वैयक्तिक गरज: समुपदेशन हे विशिष्ट गरजा, चिंता आणि उद्दिष्टे संबोधित करण्यासाठी एक प्रभावी मार्ग ठरतो आहे. पालकत्वाच्या प्रवास सुरळीत करण्यासाठी समुपदेशनाचाी नितांत गरज आहे.

5. योग्य वातावरण निर्मिती: समुपदेशन प्रक्रिया जोडप्यांना त्यांच्या अपेक्षा, भीती आणि आकांक्षांबद्दल चर्चा करण्यासाठी एक आश्वासक वातावरण तयार करते, ज्यामुळे त्यांना संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य करणे शक्य होते.

हे अधोरेखित करणे महत्त्वाचे आहे की पालकत्वाची इच्छा असलेल्या जोडप्यांसाठी समुपदेशन हा एक उत्तम पर्याय आहे. आरोग्य, जीवनशैली आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देऊन जोडप्यांनी पालकत्वाचा प्रवास आत्मविश्वासाने, धीराने आणि सकारात्मकरित्या करणे गरजेचे आहे. समुपदेशन ही केवळ वैद्यकीयदृष्ट्याच नाही तर निरोगी आणि आनंदी कुटुंबासाठी अतिशय प्रभावी ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

SCROLL FOR NEXT