Constipation Causes Saam Tv
लाईफस्टाईल

Constipation Causes : या चुकीच्या सवयींमुळे जडतो बद्धकोष्ठतेचा त्रास, चुकूनही दुर्लक्ष करु नका

Constipation Remedies : वातावरणातील बदलामुळे आपल्या आरोग्यावर याचा परिणाम होतो. पण बद्धकोष्ठता तुम्ही देखील त्रस्त असाल तर या चुका आजपासून टाळा.

कोमल दामुद्रे

Constipation Problem :

बद्धकोष्ठतेचा आजार हा सामान्य आहे. हा त्रास हार्मोनल बदल आणि पचनक्रियेच्या समस्येमुळे उद्भवतो. अनेकांना असे वाटते की, तेलकट आणि जंक फूड खाल्ल्यामुळे होतो. परंतु या समस्येला आपल्या इतर चुकीच्या सवयीं जबाबदार असतात.

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी (Habits), अवेळी जेवणे यामुळे अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठतेचे प्रमाण सध्या वाढताना दिसून येत आहे. वातावरणातील बदलामुळे आपल्या आरोग्यावर याचा परिणाम होतो. पण बद्धकोष्ठतेमुळे तुम्ही देखील त्रस्त असाल तर या चुका आजपासून टाळा.

1. फायबर आणि डिहायड्रेशनची समस्या

जर तुम्हाला वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर तुमच्या आहाराकडे लक्ष द्या. जर तुमच्या आहारात फायबरयुक्त पदार्थ नसतील तर तुम्हाला शौचास त्रास होऊ शकतो. यासोबत दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी (Water) प्या. ज्यामुळे अन्नपचन होण्यास मदत होईल.

2. बैठी जीवनशैली

बद्धकोष्ठतेच्या समस्येचे प्रमुख कारण म्हणजे शारीरिक हालचाल न करणे, एकाच ठिकाणी बसून राहाणे. ऑफिसमध्ये बसून राहिल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जेवल्यानंतर शतपावली करा.

3. औषधांचा अतिवापर

बद्धकोष्ठतेचा त्रास हा औषधांच्या (Medicine) अतिवापरामुळे होतो. तुम्ही रक्तदाब, कॅल्शियम यासारख्या समस्या होतात.

4. जीवनशैलीत बदल

जर तुमच्या जीवनशैलीत तुम्ही बदल केला तर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा सामना करावा लागेल. लांबचा प्रवास, बराच वेळ बसून राहणे, कॅफिनचे अतिसेवन हे देखील बद्धकोष्ठतेला कारणीभूत ठरू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT