Relationship Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Relationship Tips : भांडणामुळे जोडीदाराशी संवाद घडत नाही तर, 'या' उपायांनी नात्यात येईल पुन्हा गोडवा !

दोघांनाही नातेसंबंधातून काय हवे आहे? हे माहित असते आणि त्यांना त्यांच्या गरजा, अपेक्षा, तक्रारी आणि इच्छा व्यक्त करण्यात असहजता वाटत नाही.

कोमल दामुद्रे

Relationship Tips : प्रेमाचे नाते भावनेशी जोडलेले असते. त्याची तार इतकी नाजूक आहे की, ती नेहमी सुरक्षित असावी असे आपल्या प्रत्येकाला वाटते. जेव्हा दोघांनाही नातेसंबंधातून काय हवे आहे? हे माहित असते आणि त्यांना त्यांच्या गरजा, अपेक्षा, तक्रारी आणि इच्छा व्यक्त करण्यात असहजता वाटत नाही, तेव्हा ते दोघांमधील नाते मजबूत करते. यानंतर, आपण नातेसंबंधात एक पाऊल पुढे जातो आणि एकमेकांचे मित्र (Friends) बनतो.

अनेक वेळा नात्याच्या (Relation) सुरुवातीला खूप संवाद घडतो पण, काळाच्या ओघात ते कमी होऊ लागते. काहीवेळा असे होते की, आपल्या जोडीदाराला आपल्याशी बोलायचे असते पण आपल्याला त्यात रस नसतो किंवा आपण त्याला टाळण्याचा प्रयत्न करतो. जोडीदाराच्या मनात काय चालले असेल, याचा अंदाज येत नाही त्यामुळे अनेकदा नात्यात खटके उडू लागतात. ही समस्या वेळीच सोडवली नाही, तर अनेक वेळा संभाषण न झाल्यामुळे नात्यात दरी निर्माण होऊ लागते. त्यामुळे जर आपल्यालाही अशा प्रकारची समस्या होत असेल तर काही सोप्या टिप्स पाहूयात, ज्याची मदत घेऊन आपण आपले नाते अधिक दृढ करु शकतो.

१. एकमेकांसोबत फिरायला जा-

प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. अशा परिस्थितीत, इतरांना पाहून आपण बाहेरच्या सहलीची योजना आखली पाहिजे असे नाही, जर आपल्या बजेटमध्ये प्रवासाचा समावेश नसेल, तर आपण आपल्या जोडीदारासोबतही फिरायला जाऊ शकतो. यामुळे दोघांना घरातील वातावरणातून थोडा वेळ विश्रांती मिळेल.

२. जोडीदारासाठी काहीतरी खास करा-

कधी कधी प्रेम करण्यासोबतच जोडीदाराला प्रेमाची जाणीव करून देणेही आवश्यक असते. आपल्या जोडीदारासाठी काही खास करून आपल्या नात्याला अधिक मजबूत करू शकतो. आपण आपल्या जोडीदाराला खूश करण्यासाठी त्याच्या आवडी निवडी जपा.

३.जोडीदाराला मनातले लिहून सांगा-

कधी कधी लोक इतके व्यस्त होतात की, त्यांना एका छताखाली राहून बोलायला वेळ मिळत नाही.अशा परिस्थितीत आपण आपल्या मनातील गोष्टी जोडीदाराला पत्राद्वारे लिहून सांगणे फार महत्वाचे आहे. यामुळे जोडीदाराला रागही येणार नाही आणि त्यांना चांगलं वाटेल.

४. डेटवर जावे -

डेटवर जाण्याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जावे, पण आपण घरीही डेटसाठी काही खास करू शकतो. चांगले कपडे घालून जेवणात काहीतरी खास ऑर्डर करा आणि घराची सजावट करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

Maharashtra Weather : थंडीची चाहुल लागताच 'या' जिल्ह्यांवर पावसाचं सावट, हवामानाचा आजचा अंदाज काय?

Sharad Pawar: 'गद्दार गणोजीला सुट्टी नाही'; मुंडे-भुजबळांनतर शरद पवार यांचा दिलीप वळसेंवर प्रहार

Today Horoscope: अचानक हाती पैसा मिळेल, पगारवाढ होण्याची शक्यता; वाचा तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT