Cancer Symptoms in Young Adults google
लाईफस्टाईल

40 वर्षाखालील तरुणांना कॅन्सरचा धोका; पोटासंबंधीत 'ही' लक्षणे दुर्लक्षित करु नका, Colorectal Cancer म्हणजे काय?

Digestive Health: ४० वर्षांखालील तरुणांमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका वाढतो आहे. पोटदुखी, शौचातून रक्त, वजन घटणे यांसारखी लक्षणे अजिबात दुर्लक्षित करू नका.

Sakshi Sunil Jadhav

सध्या लोक डिजीटल युगात जगत आहेत. प्रत्येकाकडे डिजीटल उपकरणं आहेत. पण यामुळे अनेक तरुणांची झोप उडालीये. कारण सध्या लोक मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट डिव्हाइसेसचा वापर दिवसरात्र करत आहेत.

त्यामध्ये अनेकजण त्यांची लाइफस्टाइल डेली लाइफ रुटीन शेअर करत असतात. त्यामध्ये बऱ्यापैकी लोक चांगल्या जीवनशैलीचा वापर करताना दिसत नाहीत. याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो आणि त्यांना कमी वयातच जीवघेण्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यातला एक आजार म्हणजे, कोलोरेक्टल कर्करोग (Colorectal Cancer) आहे.

सध्या संशोधनात खूप मोठी आणि गंभीर बाब समोर आली आहे. त्यामध्ये ५० वर्षांखालील वयोगटातील लोकांमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. यामध्ये गेल्या ३० वर्षांत तरुणांमध्ये कॅन्सरचे रुग्ण कमी झाले, पण कोलोरेक्टल कॅन्सरचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसले आहेत.

कोलोरेक्टल कॅन्सरची लक्षणे कोणती? What are the symptoms of colorectal cancer?

कोलोरेक्टल कॅन्सर या जीवघेण्या आजाराची लक्षणे ही जास्त करुन पोटाच्या संबंधीत असतात. अनेकदा तरुण मंडळी ही लक्षणं दुर्लक्षित करतात. कारण ही मंडळी सतत बाहेरचं खाणं खात असतात. त्यामुळे त्यांना ही पोटासंबंधीत लक्षणे ओळखता येत नाहीत. त्यामुळे त्यावर उपचार होत नाहीत आणि तुम्हाला जीवघेण्या समस्यांना सामोरं जावं लागतं. म्हणूनच पुढी लक्षणे अजिबात दुर्लक्षित करु नका. कारण तज्ज्ञांच्या मते या आजारावर उपचार लवकर केले तरच तुम्हाला आराम मिळतो अन्यथा जीव गमवावा लागू शकतो.

कोलोरेक्टल कॅन्सर हा मोठ्या आतड्यातला म्हणजेच कोलन आणि रेक्टममध्ये सुरू होतो. यामध्ये सतत जुलाब किंवा बद्धकोष्ठतेला त्रास होतो, शौचातून रक्त जातं, पोटदुखी वाढते, पोट फुगण्याच्या समस्या वाढतात, शौच पूर्ण न झाल्यासारखं वाटतं, अचानक वजन कमी होतं, सतत थकवा किंवा अशक्तपणा अशी लक्षणं या आजारामध्ये दिसतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तरुणांनीही या लक्षणांकडे गांभीर्याने पाहणे अत्यंत आवश्यक आहे.


टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कर्तव्यावरून परतताना अग्निशामक जवानावर काळाचा घाला; नायलॉन मांज्याने गळा खोलवर कापला, रस्त्यावर रक्ताची धार

Mumbai Mayor election : ठाकरेंच्या मनसेचा भाजपला पाठिंबा? मुंबईत नव्या राजकीय समीकरणाची चर्चा

Marriage tips: नवऱ्याने बायकोसाठी कराव्यात या 5 गोष्टी, नातं राहील कायमच खूश

Mumbai minors missing: ३६ तासांत १२ अल्पवयीन मुलं बेपत्ता; मुंबईतल्या या भागांतून मुलं होतायत गायब

Maharashtra Live News Update: नागपूर महापालिकेवर महिलाराज

SCROLL FOR NEXT