Winter Drink For Better Health Saam Tv
लाईफस्टाईल

Winter Drink: हिवाळ्यात सर्दी खोकल्यापासून दूर राहण्यासाठी हे पेय नक्की प्या; रेसिपी पाहा

Cold Remedy: हिवाळ्यात सर्दी, खोकला, घसा खवखवणे अशा समस्या होतात. या काळात शरीराची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. यासाठी आहारात पौष्टिक गोष्टींचा समावेश करायचा असतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Winter Drink To Keep Warm And Healthy:

हिवाळा सुरू झाला असून वातावरणात सतत बदल होताना दिसत आहेत. हिवाळ्यात अनेक आजार होतात. या काळात सतत आळशीपणा जाणवतो. शरीराची हालचाल करण्यासाठी अनेक लोक कंटाळा करतात. शारिरीक हालचाल न केल्याने पचन समस्या वाढत आहेत. तसेच या वातावरणाच सर्दी, खोकला, घसा खवखवणे असे अनेक आजार होतात.

सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे या समस्यांपासून काळजी घ्यायला हवी. यासाठी आहारात बदल करायला हवे. पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. या काळात आहारात सूंठ, अदरक समावेश करावा. अदरक, सूंठ या गोष्टी खाताना खूप जास्त कडू आणि तिखट लागते. त्यामुळे या गोष्टींचा एकत्रितपणे ज्युस प्यायल्याने खूप फायदा होईल. (Winter Drink)

रेसिपी (Recipe)

  • एका कढईत एक लिटर पाणी उकळण्यासाठी ठेवा.

  • त्यात अर्धा चमचा सुंठ पावडर टाका.

  • त्यानंतर वेलची घाला.

  • पाणी उकळून घ्या. पाणी अर्धे होईपर्यंत उकळून घ्या.

  • हे पाणी तुम्ही दिवसभर एका बाटलीत भरुन पिऊ शकता.

अदरकचे फायदे (Ginger benefits)

अदरक खालल्याने पचनाच्या समस्या दूर हेतात. हिवाळ्यात अदरक खालल्याने शरीर ऊबदार राहते. अदरकमध्ये विटामीन सी, फायबर आणि आयनसारखे पोषक तत्वे असतातय

अदरकमध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे सर्दी-खोकला यांसारखे आजार दूर राहतात. अदरकचे सेवन केल्याने सांधेदुखी, पाठदुखी आणि सूज येणे अशा समस्या दूर होतात.

वेलची

वेलची आरोग्यासाटी खूप फायदेशीर आहे. वेलचीमधील अँटीमायक्रोबियल, अँटीऑक्सिडंट आणि अँटी इंफ्लेमेंटरी गुणधर्म असतात. जे शरीरला अनेक आजारांपासून दूर ठेवतात. वेलची खालल्याने पोटदुखी, जळजळ या समस्या दूर होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

SCROLL FOR NEXT