Kitchen tips in marathi  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Kitchen Hacks : अशाप्रकारे गॅस बर्नरवरील घाण मिनिटात साफ करा

गॅस बर्नरवरील घाण साफ कराण्यासाठी काही टिप्स.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : घराचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे त्या घराचे स्वयंपाकघर. स्वयंपाकघर (Kitchen) सांभाळण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करत असतो. त्याची सतत स्वच्छता राखत असतो. स्वयंपाकघरात सर्वात जास्त वापरली जाणारी वस्तू म्हणजे गॅस (Gas). गॅस स्टोव्हचा दिवसातून अनेक वेळा वापर आपण करत असतो. कधी स्वयंपाकासाठी, कधी दूध तापवण्यासाठी तर कधी इतर काही कामांसाठी. सततच्या वापरामुळे गॅसचा बर्नर अनेक वेळा घाण होतात. दूध (Milk) उतू गेल्यामुळे किंवा तेल सांडल्यामुळे बर्नरला छिद्रे पडू लागतात. अशावेळी गॅस बर्नरवरील घाण कशी साफ करायची हे पाहूया.

हे देखील पहा -

गॅस बर्नरवरील घाण अशी साफ करा.

१. इनोचा वापर आपण अन्नपदार्थांच्या वापरासाठी व अपचन झाल्यावर करतो परंतु, इनोच्या मदतीने गॅस बर्नरमधील घाण काही मिनिटांत साफ होऊ शकते. यासाठी एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस आणि इनो घाला. या पाण्यात बर्नर १५ मिनिटे राहू द्या. असे केल्यास बर्नर स्वच्छ होईल. उरलेल्या भागाची स्वच्छता डिटर्जंट आणि टूथब्रशच्या मदतीने आपण करु शकतो.

२. आरोग्यासाठी फायदेशीर व तितकेच स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी लिंबू उपयुक्त आहे. लिंबाचा वापर गॅस बर्नर साफ करण्यासाठी केला जाऊ शकतो. लिंबाची साल ब्रास बर्नर साफ करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. लिंबू आणि मीठ घालून बर्नर साफ करण्यासाठी गरम पाण्यात लिंबाचा रस आणि मीठ मिसळा. या पाण्यात गॅस बर्नर रात्रभर ठेवा. दुसऱ्या दिवशी लिंबाच्या सालीला मीठ लावून बर्नर स्वच्छ करा. बर्नर चमकण्यास मदत होईल.

३. व्हिनेगरचा वापर आपण बऱ्याचदा खाण्यापिण्यात करतो. तसेच गॅस बर्नर साफ करण्यासाठी देखील याचा अधिक चांगला वापर केला जाऊ शकतो. यासाठी पाण्यात व्हिनेगर घालून त्यात बेकिंग सोडा मिक्स करा. या पाण्यात बर्नर ठेवा. लपलेली घाण बाहेर येईल व बर्नर चमकण्यास मदत होईल.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky zodiac signs: कार्तिक कृष्ण षष्ठीत चार राशींना लाभ; आत्मविश्वास आणि आर्थिक सुधारणा दिसणार

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र गारठला, मुंबई, पुण्यासह राज्याचा पारा घसरला

Crime : धक्कादायक! काँग्रेस नेत्याने पत्नीला जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न, महाराष्ट्र हादरला

Mumbai Rent Rules: मुंबईकरांच्या कामाची बातमी! घर भाड्याने देण्यापूर्वी हे काम कराच अन्यथा ₹५००० दंड भरा

Vipreet Rajyog 2025: 28 नोव्हेंबर रोजी मीन राशीत मार्गी होणार शनी; विपरीत राजयोगामुळे मिळणार पैसाच पैसा

SCROLL FOR NEXT