Chickenpox Care google
लाईफस्टाईल

Chickenpox Care : उन्हाळ्यात कांजण्या आल्यावर कोणती काळजी घ्यावी? डॉक्टरांनी दिली माहिती

Chickenpox Care In Summer: कांजण्या हा संसर्गजन्य आजार आहे. उन्हाळ्यात हा त्रास जास्त प्रमाणात जाणवू शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.

Sakshi Sunil Jadhav

कांजण्या (Chickenpox) हा आजार संसर्गजन्य आहे. तसेच हा आजार उष्णतेमुळे जाणवतो. सध्या उन्हाळा वाढत चालला आहे. त्यामुळे या तुम्ही या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. हा आजार खूप त्रासदायक आहे. जर याची लागण झाली तर तुम्हाला उन्हाळात खूप जास्त त्रास सहन करावा लागतो. कारण यामध्ये अंगावर लाल पुरळ, खाज, ताप आणि अशक्तपणा अशी लक्षणं दिसतात. यासाठी योग्य काळजी आणि स्वच्छता राखणं गरजेचं आहे. पुढे याबद्दल काही उपाय दिले आहेत.

कांजण्या आल्यावर काय खावे?

कांजण्या आल्यावर हलकं आणि पचायला सोपं असं जेवण घ्या. कोणताच जर पदार्थ खाऊ नका. तसेच कांजण्या या ७ दिवसात कमी होतात. त्यामुळे या दिवसात तुम्ही कोणाच्याही संपर्कात राहू नका आणि इतरांना तुमच्या संपर्कात घेऊ नका. ताजी फळं खा, नारळपाणी, ताक, सूप हे पदार्थ रोज खा.

व्हिटॅमिन C असलेली फळं जसं की, संत्री, मोसंबी, डाळिंब ही फळं योग्य ठरतील. या दिवसात जेवण जात नाही. त्यामुळे फळं हा सुद्धा चांगला पर्याय आहे. तसेच यामध्ये जास्त पाणी पिणं गरजेचं आहे.

काय खाणं टाळावं?

ज्या रुग्णांना कांजण्या आल्यात त्यांनी खूप तिखट, तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणं टाळावं. जंक फूड आणि थंड पेयं कमी सेवन करा. जास्त साखर खाऊ नका.

कांजण्या आलेल्यांनी स्वच्छता कशी राखावी?

सर्वात आधी शरीर आणि कपडे स्वच्छ ठेवा. रोज कोमट पाण्याने अंघोळ करा. नखं लहान ठेवा, जेणेकरून खाजवल्यावर कोणत्याही जखमा होणार नाहीत.बेडशीट, टॉवेल आणि कपडे नियमित बदला. तसेच इतरांपासून वेगळे ठेवा. रुग्णाला इतरांपासून काही काळ दूर ठेवा, कारण कांजण्या संसर्गजन्य असतात. घरात स्वच्छ आणि हवेशीर वातावरण ठेवा. दिवसांत इतरांना आणणं टाळा.

खाज कमी करण्यासाठी उपाय

डॉक्टरांच्या सल्ल्याने लोशन किंवा औषधे वापरा. त्वचा कोरडी आणि स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. खाजवल्यास डाग पडू शकतात, त्यामुळे त्वचा कुरवाळणं टाळा. तुम्हाला जर या आजारात ताप, श्वास घ्यायला त्रास किंवा पुरळांमध्ये पू किंवा संसर्ग दिसत असेल तर लगेचच डॉक्टरांकडे जावून तपासणी करून या.


टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुमंत्रालयातील कॅन्टीनला क्लीनशीट कशी? संजय गायकवाडांचा संताप

3 Gram Mangalsutra Designs: ऑफिस ते रोजसाठी परफेक्ट! ३ ग्रॅमचे लाईटवेट मंगळसूत्र पाहा ट्रेंडी ७ सुंदर डिझाइन्स

Lohagad fort Video : लोहगड किल्ल्यावर पर्यटकांनी केलं धुम्रपान; शिवप्रेमींचा दणका, व्हिडिओ व्हायरल

Abhijeet Dipke Video : पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलक मुलींचे कपडे फाडून मारहाण केली; अभिजीत दिपके काय काय म्हणाले?

Accident : लष्करी तळाजवळ भीषण अपघात; मेजरचा जागीच मृत्यू, लेफ्टनंट दर्जाचे २ अधिकारी गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT