Sakshi Sunil Jadhav
भारतात, तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेकजण हृदयविकाराच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात. यामुळे गंभीर परिणाम शरीराला सहन करावे लागतात.
हृदयाची काळजी नीट न घेतल्यास हृदयविकार सायलेंट किलरसुद्धा ठरू शकतो. छातीत दुखणे म्हणजेच हृदयविकाराचा झटका येणे असे अनेकांना वाटते.
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी हृदय अनेक संकेत देत असते. त्यावर वेळीच उपचारपद्धती केल्यास हा धोका कमीकरता येतो. याबाबत एका तज्ज्ञांनी माहिती दिली आहे, जाणून घ्या.
उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ, मधुमेह लठ्ठपणा, धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन, व्यायामाचा अभाव, मानसिक ताण या घटकांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये 'प्लाक' जमा होतो, ज्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो.
छातीवर दाब येणे, जळजळ होणे, अस्वस्थता वाटणे, थकवा, चालताना दम लागणे, चक्कर येणे, कडाक्याच्या थंडीतही अचानक घाम येणे, मळमळ होणे हे हृदयविकाराचे लक्षण असू शकतात.
हार्ट अटॅकची लक्षणे केवळ छातीपुरती मर्यादित नसून शरीराच्या इतर भागांतही वेदना जाणवतात. यामध्ये हातांत वेदना होणे, जबडा, मान किंवा घसा दुखणे, खांदे दुखी याचा समावेश आहे.
त्याचबरोबर अपचन, मळमळ किंवा उलट्या होणे. जर ही लक्षणे दिसून येत असतील तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे.
नियमित व्यायाम, धूम्रपान सोडणे, वजन, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी या गोष्टींची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.