Jowar Idli Recipe: मऊसूत ज्वारीची इडली कशी बनवायची? वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

Sakshi Sunil Jadhav

हेल्दी नाश्ता

सध्या सगळ्यांनाच हेल्दी नाश्ता करायला आवडतो. पुढील बातमीत आपण ज्वारीच्या इडल्यांची सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत.

soft jowar idli

साहित्य

१ कप ज्वारीचे पीठ, २ कप रवा, १ कप दही, २ कप पाणी, १ चमचा आलं-हिरवी मिरची पेस्ट, चवीनुसार मीठ, १ चमचा ईनो किंवा बेकिंग सोडा, थोडी कोथिंबीर आणि तेल इ.

healthy breakfast recipe

मिश्रण तयार करा

एका मोठ्या भांड्यात ज्वारीचं पीठ, रवा आणि दही एकत्र करून घ्या.

easy idli recipe

पाणी घाला

आता गरजेनुसार त्यामध्ये पाणी घालून घट्टसर बॅटर तयार करा.

easy idli recipe

मसाले तयार करा

आता बॅटरमध्ये आलं-हिरवी मिरची पेस्ट, मीठ आणि कोथिंबीर घालून चांगलं मिक्स करून घ्या.

easy idli recipe

बॅटर विश्रांतीला ठेवा

पुढे हे मिश्रण १५ ते २० मिनिटं झाकून ठेवा, त्यामुळे रवा मऊ होतो.

idli | yandex

ईनो घाला

इडली बनवण्यापूर्वी त्यात ईनो किंवा बेकिंग सोडा घाला आणि हलक्या हाताने मिक्स करा.

idli | yandex

इडली प्लेट तयार करा

इडलीच्या साच्यांना हलके तेल लावा. प्रत्येक साच्यात तयार बॅटर ओता.

gluten free idli

वाफेवर शिजवा

इडल्या १० ते १२ मिनिटं वाफेवर शिजवा. तयार ज्वारीच्या इडल्या नारळाची चटणी किंवा सांबारसोबत सर्व्ह करा.

gluten free idli | pinterest

NEXT: घरातली व्यक्तीच जर शत्रू बनली तर? चाणक्यांनी सांगितले 6 सावध करणारे उपाय

toxic family relationships
येथे क्लिक करा