Chicken Tikka Recipe Inventor Death  Saam Tv
लाईफस्टाईल

Chicken Tikka Recipe Inventor Death : चिकन टिक्का मसाला रेसिपी बनवणारे शेफ अली अहमद याचे निधन

२२ डिसेंबर रोजी स्कॉटिश शेफ अली अहमद यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले.

कोमल दामुद्रे

Chicken Tikka Recipe Inventor Death : तुम्ही जर नॉनव्हेज खाण्याचे शौकीन असाल तर तुम्ही चिकन टिक्का मसाल्याची चवही चाखली असेल. मांसाहार प्रेमींना चिकन टिक्का मसाल्याची चव आवडते, लोक तो चवीचवीने खातात. चिकन टिक्का मसाला रेसिपी शोधण्याचे श्रेय स्कॉटिश शेफ अली अहमद यांना जाते. अली अहमदने तो पहिल्यांदाच बनवला असल्याचं म्हटलं जातं. आज म्हणजेच २२ डिसेंबर रोजी स्कॉटिश शेफ अली अहमद यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन (Death) झाले.

चिकन टिक्का मसाला बनवण्याची कल्पना कशी सुचली?

  • अली अहमद यांनी 1970 मध्ये पहिल्यांदा चिकन टिक्का मसाला बनवला होता.

  • 1970 मध्ये एका ग्राहकाच्या तक्रारीनंतर त्यांना चिकन टिक्का मसाला बनवण्याची कल्पना सुचली.

  • चिकन टिक्का मसाला पहिल्यांदा त्याच्याच रेस्टॉरंटमध्ये बनवला गेला जेव्हा एका ग्राहकाने चिकन टिक्का खाताना सॉस ऑर्डर केला आणि चिकन टिक्का खूप कोरडा असल्याचे सांगितले.

  • चिकन टिक्का कोरडा असल्याची तक्रार (Complaint) ग्राहकाने केल्यावर अली अहमद यांनी दही, मलई आणि मसाल्यांच्या सॉसमध्ये चिकन टिक्का शिजवण्यास सुरुवात केली.

  • अशा चिकन टिक्का मसालाचा शोध लागला आणि लवकरच चिकन टिक्का मसाला जगभर प्रसिद्ध झाला.

  • 2009 मध्ये एएफपी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अली अहमद यांनी सांगितले की, चिकन टिक्का मसाला ग्राहकांच्या चवीनुसार बनवला जातो.

  • ते म्हणाले की, ग्राहकांना गरम करीसोबत खायला आवडत नाही, म्हणून चिकन टिक्का मसाला हा दही आणि मलईचा सॉस वापरून बनवला जातो.

अली अहमद यांच्याबद्दल

  • अली अहमद अस्लम यांचा जन्म पाकिस्तानच्या पंजाब भागात झाला.

  • नंतर तो आपल्या कुटुंबासह ग्लासगोला गेला. 1964 मध्ये त्यांनी ग्लासगोच्या पश्चिमेला शीश महाल उघडला.

  • अली अहमद यांच्या निधनाची बातमी त्यांच्या ग्लासगो, स्कॉटलंड येथील शीशमहल रेस्टॉरंटने दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT