Cheapest 108mp Camera Phone Saam Tv
लाईफस्टाईल

108mp Camera Phone: 108MP कॅमेरा असलेले हे आहेत सर्वात स्वस्त ३ फोन, किंमत 20 हजार रुपयांपेक्षाही कमी; पाहा लिस्ट

Smartphones News: 108MP कॅमेरा असलेले हे आहेत सर्वात स्वस्त ३ फोन, किंमत 20 हजार रुपयांपेक्षाही कमी; पाहा लिस्ट

Satish Kengar

Cheapest 108mp Camera Phone:

जर तुम्हाला फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीची आवड असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला अशा तीन स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये 108 मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल. इतकेच नाही हे तिन्ही फोन तुमच्या खिशाला परवडणाऱ्या रेंजमध्ये आहे. कोणते आहेत हे फोन याबद्दल जाणून घेऊ...

Realme c53

फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी तुम्हाला Realme C53 मध्ये 6 GB आणि 4 GB रॅमचा पर्याय मिळत आहे. 5000 mAh बॅटरी असलेल्या फोनमध्ये तुम्हाला 108 मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी तुम्हाला यात 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. जरी या फोनची मूळ किंमत 13,999 रुपये आहे, परंतु तुम्ही हा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट वरून 14 टक्के डिस्काउंटसह 11,999 रुपयांना हा फोन खरेदी करू शकता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Infinix Note 30 5G

या फोनची मूळ किंमत 19,999 रुपये आहे, परंतु तुम्हाला 27 टक्के डिस्काउंटसह 14,499 रुपयांना मिळत आहे. या फोनमध्ये तुम्हाला ड्युअल कॅमेरा सेटअप मिळत आहे. ज्यामध्ये प्राइमरी कॅमेरा 108 मेगापिक्सेलचा आहे, तुम्हाला त्यामध्ये AI लेन्स देखील मिळत आहेत. सेल्फीसाठी, तुम्हाला 16 मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल. (Latest Marathi News)

MOTOROLA g72

हा फोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला तुमचे बजेट थोडे वाढवावे लागेल. पण या फोनमध्ये तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यामध्ये प्राइमरी कॅमेरा 108 मेगापिक्सल, सेकंडरी कॅमेरा 8 मेगापिक्सल आणि तिसरा 2 मेगापिक्सल कॅमेरा आहे. सेल्फीसाठी तुम्हाला 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. या फोनची मूळ किंमत 21,999 रुपये आहे. परंतु तुम्ही फ्लिपकार्टवरून हा फोन 16,999 रुपयांमध्ये करू शकता.

या सवलती आणि किमतीचे तपशील प्लॅटफॉर्मनुसार दिलेले आहेत, त्यांच्या किमतीत आणि वेळेनुसार सवलतीत फरक असू शकतो. या स्मार्टफोन्समध्ये तुम्हाला 108 मेगापिक्सेल कॅमेरा आणि अनेक जबरदस्त फीचर्ससुद्धा मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांकडून २ वर्षांच्या मुलीवर गंभीर गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण? Video

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

Saturday Horoscope : विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मनोबल कमी होईल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT