सध्या स्मार्टफोनमध्ये विविध प्रकार लॉंच होत आहेत. ग्राहक त्यामध्ये OnePlus चे स्मार्टफोन विकत घेत आहेत. ग्राहकांचे लक्ष आता OnePlus 13s कधी लॉंच होणार याकडे आहे. याची तारिख मागच्या काही दिवसांपुर्वीच जाहीर करण्यात आली आहे. ती म्हणजे ५ जून २०२५ आहे. मात्र याची किंमत सुद्धा लिक झालीची माहिती आता समोर आलीये आहे. OnePlus 13s कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन हा Amazon आणि OnePlus च्या वेबसाईटवर लॉंच होणार आहे.
OnePlus 13s ची खरी किंमत
OnePlus 13s ची किंमत लोकप्रिय टिपर्स योगेश आणि अभिषेक यादव यांच्या म्हणण्यानुसार, भारतात OnePlus 13s ची सुरुवातीची किंमत ५५,००० रुपयांपेक्षा कमी असेल. कारण हा रिब्रॅंडेड व्हर्जन आहे. नुकताच चीनमध्ये CNY 3,399 म्हणजेच अंदाजे ४०,००० रुपयांमध्ये हा फोन लॉंच केला. हा फोन मध्यम रकमेच्या फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये मजबूत स्पर्धक बनू शकतो. लॉंच होण्यापूर्वी वनप्लसने या फोनचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स प्रदर्षित केले आहेत.
OnePlus 13s चे स्पेशल फिचर्स
OnePlus 13s त्याच्या आकर्षक डिडाइनमध्ये लॉंच होणार आहे. सोबत या स्मार्ट फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर असेल. जो या OnePlus 13 मध्ये असणार आहे. तसेच 6260mAH बॅटरी, 50MP ड्युअल कॅमेरा असेल. हा गेमिंगसाठी आणि हाय कॉलिटीसाठी ओळखला जाणारा स्मार्ट फोन ठरणार आहे. 16 जीबी पर्यंतचा LPDDR५x रॅम. 1 टीबी UF आणि 4.0 स्टोरेजच्या कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असणार आहे.