Chanakya Niti On Money  Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Money : या चुकांमुळे घरात येते दारिद्रय; कुटुंबाला होतो त्रास, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला

How To Become Rich : माणूस जर सतत पैशांची अति उधळण करत असेल तर देवी लक्ष्मी त्याच्यावर नाराज होते.

कोमल दामुद्रे

Saving Money : हल्लीच्या महागाईच्या जगात पैसा प्रत्येकालाच हवा असतो. वाढत्या गरजांमुळे माणूस पैसा मिळवण्यासाठी अनेक चांगले वाईट कर्म करतो. माणसाच्या अशा अनेक चुका आहेत ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्याच्यामुळे त्याला आर्थिक संकटांना नेहमी सामोरे जावे लागते. माणूस जर सतत पैशांची अति उधळण करत असेल तर देवी लक्ष्मी त्याच्यावर नाराज होते.

चाणक्य म्हणतात की, माणसाच्या काही छोट्या चुका असतात ज्या त्याच्या गरिबीचे कारण बनतात. यामुळे लक्ष्मी घरातून बाहेर पडते आणि व्यक्तीला धनहानी सहन करावी लागते. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

जी व्यक्ती रात्री स्वयंपाकघरात (Kitchen) खरकटी भांडी ठेवते अशा घरात देवी लक्ष्मीची कृपा कधीच होत नाही. खरकटी भांडी चुलीच्या वर किंवा आजूबाजूला ठेवू नयेत. त्यामुळे गरिबीचा सामना करावा लागतो

चाणक्य म्हणतात की जिथे स्त्रियांचा (Women) अनादर होतो तिथे लक्ष्मी वास करत नाही. त्याच्या गैरवर्तनामुळे ती व्यक्ती आर्थिक संकटातून जात असते. मग तो श्रीमंत असो वा गरीब, माणसाची वाईट वागणूक, त्याची असभ्य भाषा त्याला गरीबीच्या मार्गावर घेऊन जाते.

चाणक्य नीती सांगते की संध्याकाळी झाडू मारल्याने घरात (Home) तयार होणारी सकारात्मक ऊर्जा निघून जाते. झाडूला देवी लक्ष्मीचे रुप मानले जाते त्यामुळे सायंकाळच्या वेळी घरातील केर काढताना झाडूचा वापर शक्यतो करु नका.

चाणक्य म्हणतात की ते लोक नेहमी आर्थिक संकटातून जातात, जे पैशाला महत्त्व देत नाहीत, जे अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवत नाहीत. अशा लोकांना धनहानी होण्याची शक्यता कायम असते.

कमावण्याच्या लालसेपोटी पैशाचा चुकीचा वापर करणे किंवा पैशाच्या जोरावर इतरांना त्रास देणे हे माणसाला त्याच्या विनाशाच्या उंबरठ्यावर आणते. पैसा हा क्षणभर आनंद देऊ शकतो पण एखाद्याला त्यामुळे दुखवल्यास त्याचा पश्चाताप आयुष्यभर सोसावा लागतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणेकर बिझनेसमन होणार विराट कोहलीच्या RCBचा मालक, तब्बल १७५५३ कोटींच्या डीलची चर्चा

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Shocking: शाळेतील बोर्ड मिटिंगमध्ये अचानक कपडे काढू लागली महिला, अधिकारी पाहतच राहिले; VIDEO व्हायरल

Mira-Road : धक्कादायक! मिरा रोडमध्ये गरब्यात फेकली अंडी, तणाव वाढला | VIDEO

Idli Chutney Recipe: इडलीची चटणी खूप पातळं होतेय? मग ही खास स्टेप एकदा नक्की फॉलो करा

SCROLL FOR NEXT