Chanakya Niti Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti : ज्या स्त्री-पुरुषांकडे असतील 'या' 5 गोष्टी, त्यांचे जीवन राहिल नेहमीच आनंदी !

मागच्या जन्मातल्या कर्माच्या आधारे मनुष्याला वर्तमान जन्मात असे ५ सुख प्राप्त होतात,

कोमल दामुद्रे

Chanakya Niti : चाणक्यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या ज्याच्या आपल्या भूतकाळाशी संबंध आहे. त्यांनी सांगितले की, मागच्या जन्मातल्या कर्माच्या आधारे मनुष्याला वर्तमान जन्मात असे ५ सुख प्राप्त होतात, ज्यामुळे त्याचे जीवन सफल होते. ते पाच सुख कोणते आहेत ते जाणून घेऊया.

1. जीवनसाथी -

या कलियुगात चांगला नवरा किंवा पत्नी मिळणे प्रत्येकाच्या नशिबात नसते. चाणक्य सांगतात की, ज्यांनी मागील जन्मी चांगले कर्म केले त्यांनाच योग्य जीवनसाथी मिळतो. जो मरेपर्यंत सुख-दु:खात खांद्याला खांदा लावून उभा असतो.

2. मनी (Money) मॅनेजमेंट -

जर तुम्हाला तुमचा आज आणि भविष्यकाळ सुरक्षित आणि आनंदी बनवायचा असेल तर तुमच्याकडे पैशाचा योग्य वापर करण्याची बुद्धी असायला हवी. प्रत्येकाकडे पैसा असतो पण त्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची क्षमता प्रत्येकाकडे नसते. पैशाचा योग्य वापर कसा करायचा हे ज्यांना माहीत आहे, ते तारुण्यात तसेच वृद्धापकाळातही आनंदाने जगतात.

3. दानाची भावना -

पाई टू पाई जोडत राहणे ही चांगली सवय आहे, परंतु चांगल्या आणि गरजूंना मदत करणे, दानाची भावना असणे जीवन आनंददायक बनवते. दानाने पैसा कमी होत नाही तर दुप्पट होतो.

4. पचनशक्ती -

चाणक्य म्हणतात की ते लोक खूप भाग्यवान असतात ज्यांची पचनशक्ती चांगली असते. चांगले अन्न (Food) खाल्ल्याने आनंद मिळतो, पण ते पचले नाही तर शरीर रोगांचे छावणी बनते. गंभीर आजार (Disease) उद्भवू लागतात. हा असा आनंद आहे जो व्यक्तीला दीर्घकाळ ऊर्जावान आणि निरोगी ठेवतो.

5. कामावर नियंत्रण -

आचार्य चाणक्य सांगतात की, चांगले काम करण्याची शक्ती असलेले लोक भाग्यवान देखील असतात. ज्या व्यक्तीला लैंगिक शक्ती कशी नियंत्रित करायची हे माहित असते, तो जीवनात नेहमी आनंदी असतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disabled Scholarship: राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ, शिशुवर्ग ते बारावीच्या दिव्यांग विद्यार्थांना दिलासा

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकने मजुरांना चिरडलं; ६ महिलांचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: डोंबिवली एमआयडीसीमध्ये पाणीपुरवठा ठप्प

Farmer Loan waiver : महाराष्ट्रातील ७० हजार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ५०० कोटी रुपये मिळणार

एकनाथ शिंदे यांची ताकद आणखी वाढणार; २ पॉवरफुल नेत्यांची शिवसेनेत एन्ट्री होणार, राजकीय समीकरण बदलणार

SCROLL FOR NEXT