Chanakya Niti Saam TV
लाईफस्टाईल

Chanakya Niti : प्रत्येक लहान मुलांनी चाणक्य नीतीचे 'हे' नियम पाळले पाहिजेत; सर्व कामात यश मिळेल

Chanakya Niti for Children : मुलांवर योग्य संस्कार देखील व्हायला हवेत. त्यामुळे आज चाणक्य नीतीमध्ये मुलांच्या विकासाठी काय केले पाहिजे, मुलांनी कोणत्या गोष्टींचे पालन केले पाहिजे, याची माहिती जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

चाणक्य हे मोर्य साम्राज्यातील एक मोठे अर्थशास्त्रज्ञ, कूटनीती आणि राजनीती तज्ञ होते. त्यांनी आपल्या काळात सामान्य नागरिकांना आपल्या जीवनात सुखी आयुष्य जगण्यासाठी काही नियम आणि अटी सांगितल्या आहेत. याचे पालन केल्याने व्यक्ती एखाद्या विषयावर योग्य पद्धतीने निर्णय घेऊ शकतो.

आपल्या मुलांनी खुप शिकावे मोठे व्हावे आणि एक चांगला नागरिक व्हावे असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असते. त्यासाठी मुलांवर योग्य संस्कार देखील व्हायला हवेत. त्यामुळे आज चाणक्य नीतीमध्ये मुलांच्या विकासाठी काय केले पाहिजे याची माहिती जाणून घेणार आहोत.

विद्या धनम सर्वस्वं, प्रमादं च निरर्थकम्

शिक्षण

चाणक्य नीतीमध्ये याचा अर्थ असा होतो की प्रत्येक व्यक्तीला जीवनात पुढे जाण्यासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग आहे. शिक्षणाने तुम्ही सर्व अडचणी दूर करू शकता. शिक्षण हे आयुष्यभर घ्यावे. वयातील प्रत्येक टप्प्यात विविध आणि नवीन गोष्टी शिकण्याची तयारी असावी.

कठीण परिश्रम

लहान मुलांसाठी चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आले आहे की जीवनाचा खरा अर्थ परिश्रम आहे. जर तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करायचे असेल तर त्यासाठी कठीण परिश्रम महत्वाचे आहे. जी व्यक्ती आयुष्यात कठीण परिस्थितीचा सामना बुद्धीने करते त्या व्यक्तीला जीवनात सुखाला गवसणी घालत येते.

विनम्रता

तुमच्या मुलांना चाणक्य नीतीमधील हे वचन नक्की शिकवा. यामध्ये मुलांमध्ये विनम्रता असणे किती महत्वाचे आहे हे सांगण्यात आले आहे. मुलांमध्ये विनम्रता असेल तरच त्यांना त्यांच्या कार्यात मान आणि सन्मान मिळवता येतो. चंचल आणि अहंकार असलेली मुलं कधीच चांगले शिक्षण घेऊ शकत नाहीत. तसेच त्यांना आयुष्यात सक्सेस देखील मिळवता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026 : 14 सप्टेंबरला दोन सण एकाच दिवशी! उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या योग्य वेळ

Satara Crime: तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राचार्याविरोधात पोलिसांची मोठी कारवाई

गणरायासाठी सोन्याच्या दागिन्यांचे 5 सुंदर डिझाईन्स, जे पाहून तुम्हालाही आवडतील

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय; एकाच झटक्यात काढले ४ महत्त्वाचे GR

Maharashtra News Live Update: तहसीलदारांच्या रील प्रकरणावर काँग्रेस संतप्त; कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT