Champa Shashti 2022  Saam Tv
लाईफस्टाईल

Champa Shashti 2022 : आज आहे चंपाषष्ठी; जाणून घ्या, पूजा विधी व महत्त्व

कोमल दामुद्रे

Champa Shashti 2022 : महाराष्ट्रात खंडोबाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. चंपा षष्ठीच्या दिवशी खंडोबाची विशेष पूजा केली जाते. हा दिवस सण म्हणून साजरा केला जातो. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला चंपाषष्ठी व्रत पाळले जाते. या दिवशी भगवान शंकराच्या मार्तंडेय रूपाची पूजा केली जाते.

भगवान खंडोबा हा भगवान शिवाचा अवतार देखील मानला जातो. पंचांगानुसार, यावर्षी चंपा षष्ठी व्रत 29 नोव्हेंबर 2022, मंगळवार (चंपा षष्ठी 2022 तारीख) रोजी साजरी केली जाईल. असे मानले जाते की, या दिवशी पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. चला जाणून चंपा षष्ठी व्रत, शुभ मुहूर्त आणि योग.

चंपा षष्ठी व्रत तिथी

  • षष्ठी तिथी सुरु : 28 नोव्हेंबर 2022, सोमवार दुपारी 01:35 पासून

  • षष्ठी तिथी समाप्ती : 29 नोव्हेंबर 2022, मंगळवार सकाळी 11:04 पर्यंत

  • चंपा षष्ठी व्रत तारीख: २९ नोव्हेंबर २०२२, मंगळवार

चंपा षष्ठी व्रत योग

चंपा षष्ठीच्या दिवशी ध्रुव, रवि आणि द्विपुष्कर योग तयार होत आहेत. या दिवशी ध्रुव योग दुपारी 2.53 वाजता आणि रवियोग सकाळी 6.55 वाजता असेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 11.04 ते सायंकाळी 06.06 पर्यंत द्विपुष्कर योग असेल. पंचांगानुसार सकाळी 06.45 ते 08.05 पर्यंत पूजेसाठी सर्वात शुभ राहील.

चंपा षष्ठी 2022 पूजा पद्धत

  • सकाळी स्नान करून चंपा षष्ठीचे व्रत करून भगवान शंकराची पूजा करण्याची शपथ घ्यावी.

  • यानंतर भगवान शंकराच्या खंडोबाची विधिवत पूजा करावी.

  • तुमची इच्छा असल्यास या दिवशी शिवलिंगावर गंगेचे पाणी आणि गाईच्या दुधाने (Milk) अभिषेक करा.

  • नंतर बेलपत्र, भांग, मदार फूल, धतुरा, वांगी, बाजरी, फळे, भाज्या, हळद (Turmeric) इत्यादी अर्पण करा.

  • यानंतर भगवान शंकराची आरती करावी. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही भगवान शिवाच्या मंत्रांचाही जप करू शकता.

चंपा षष्ठी व्रताचे महत्त्व

चंपा षष्ठीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने अज्ञानामुळे झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. यासोबतच भक्तांना ऐश्वर्य प्राप्त होते. या दिव्याचे पूजन करून व्रत केल्यास मोक्ष प्राप्त होतो आणि मागील जन्माची पापेही धुऊन जातात, अशीही श्रद्धा आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे 'विराट' आघाडी; न्यूझीलंडची ३५६ धावांनी सरशी, रोहितसेना पिछाडीवर!

Viral Video: लोकलच्या गर्दीत अंताक्षरीचा खेळ! टाळ, तबल्यासोबत जोरदार मैफिल रंगली; सुंदर VIDEO एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT