Madhuri Dixit Instagram / @madhuridixitnene
लाईफस्टाईल

Beauty Tips : वयाच्या 55 व्या वर्षी देखील माधुरी सारखे तरुण दिसायचे आहे ? तर, 'या' टिप्स फॉलो करा

माधुरी म्हणते, तुम्ही काय खाता आणि काय पिता, तुम्ही त्वचेवर काय लावता हे खूप महत्वाचे आहे.

कोमल दामुद्रे

Beauty Tips : माधुरी दीक्षितला सौंदर्यतेची राणी म्हटलं तर वावग ठरणार नाही. बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री असून ती नेहमी प्रकाशझोतात असते. वयाच्या ५५ व्या वर्षात असूनही ती आजही तरुण असल्यासारखीच भासते. त्यामुळे तिचा प्रचंड चाहता वर्ग आहे.

माधुरी दीक्षित अशा लोकांपैकी एक आहे ज्यांनी 'वाईनसारखे वृद्धत्व' ही म्हण खरी केली आहे. तिचे वय नक्कीच वाढत आहे, पण ती अधिकाधिक डौलदार होत आहे. माधुरी दीक्षितच्या सौंदर्याचे एक कारण म्हणजे ती तिच्या शरीराची खूप चांगली काळजी घेते. नृत्य, आहार, त्वचेची काळजी सर्वकाही शक्य तितके नैसर्गिक करते आणि त्याच वेळी तिची दैनंदिन दिनचर्या चांगल्या प्रकारे पाळते. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते आणि तिच्या दिनचर्येशी संबंधित अनेक गोष्टी शेअर करत असते.

काही काळापूर्वी माधुरी दीक्षितने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये ती फक्त तिच्या स्किन केअर रूटीनबद्दल बोलली होती. आम्ही तुम्हाला अशाच स्किन केअर रूटीनबद्दल सांगणार आहोत. माधुरी दीक्षितच्या त्वचेचे रहस्य अनेकांना जाणून घ्यायचे आहे आणि त्यामुळेच माधुरीने स्वतः हा व्हिडिओ अपलोड केला आहे.

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये माधुरीने सांगितले की, त्वचेचे दोन भाग केले जाऊ शकतात. अंतर्गत आणि बाह्य - तुम्ही काय खाता आणि काय पिता, तुम्ही त्वचेवर काय लावता हे खूप महत्वाचे आहे.

1. तणावासाठी ध्यान आणि विश्रांती करा-

माधुरी सांगते की, तणावाचा परिणाम त्वचेवर खूप दिसून येतो आणि या परिणामामुळे त्वचा म्हातारी दिसू लागते. अशा परिस्थितीत रात्री झोपण्यापूर्वी थोडेसे ध्यान आणि विश्रांती आवश्यक आहे.

काय करायचं-

  • झोपण्यापूर्वी चेहऱ्याच्या स्नायूंना आराम द्या. तुम्हाला हवे असल्यास थोडासा मॉइश्चरायझिंग मसाजही करा.

  • सकाळी उठल्यानंतर ध्यान करा आणि तणावाला तुमच्यावर वर्चस्व न मिळणे खूप महत्वाचे आहे.

  • स्वतःशी सकारात्मक गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करा.

Madhuri Dixit

2. रात्री झोपण्यापूर्वी गुलाबपाणी लावा-

माधुरीच्या मते, रात्री झोपण्यापूर्वी टोनरचा वापर करावा. त्वचा चांगली आणि मऊ दिसण्यासाठी त्वचा स्वच्छ राहणे आवश्यक आहे. झोपण्यापूर्वी तुम्ही तुमचा चेहरा (Skin) धुवा, कारण थोडासा मेकअपही तुमच्या चेहऱ्याला हानी पोहोचवू शकतो.

चेहरा धुतल्यानंतर टोनर म्हणून गुलाबपाणी वापरा. टोनरचा वापर अतिशय खास पद्धतीने केला जातो. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही इतर टोनर देखील निवडू शकता, परंतु लक्षात ठेवा की टोनरमध्ये अल्कोहोल असेल तर त्वचेचे नुकसान होऊ शकते.

3. व्हिटॅमिन सी सीरम-

माधुरी म्हणते की ती व्हिटॅमिन (Vitamins) सी सीरमवर खूप विश्वास ठेवते कारण ते फक्त फ्रिकल्स दूर करत नाही तर त्वचेला एक वेगळी चमक देखील आणते. चेहरा धुतल्यानंतर, आपण व्हिटॅमिन सी सीरम लावावे आणि त्वचा पूर्णपणे मॉइश्चराइज होईल याची काळजी घ्यावी. जर त्वचेला मॉइश्चरायझ केले नाही तर तुमचा चेहरा चांगला दिसणार नाही आणि कोरड्या त्वचेमुळे त्वचेचे नुकसानही वाढते.

तुम्ही व्हिटॅमिन सी सीरम घरी देखील बनवू शकता. त्वचा मॉइश्चरायझिंगचा प्रश्न आहे, जर तुमची त्वचा तेलकट असेल तर वॉटर-बेस्ड मॉइश्चरायझर वापरा आणि जर तुमची त्वचा कोरडी असेल तर क्रीम-आधारित मॉइश्चरायझर वापरा.

माधुरी दीक्षितच्या जीवनशैलीशी संबंधित महत्त्वाच्या टिप्स-

  • दिवसातून किमान 8 ग्लास पाणी प्या.

  • झोपेच्या चक्राकडे लक्ष द्या. किमान 7 तास झोपा.

  • ज्यूसपेक्षा जास्त फळे खाण्याचा प्रयत्न करा.

  • साखर आणि तेलकट पदार्थांपासून दूर राहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT