Car Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Car Tips : वीकेंडला लाँग ड्राईव्हला जाताय? या कार फीचर्सचा वापर करा; प्रवास होईल सुखकर

Car Feature : आरामात प्रवास व्हावा यासाठी कारचा वापर केला जातो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Car Feature :

सध्याच्या काळात अनेकांकडे कार असतात. आरामात प्रवास व्हावा यासाठी कारचा वापर केला जातो. कार घेण्याचे मुख्य कारण म्हणजे सहज कुठेही जाता यावे. प्रवास सुखकर आणि सोयीस्कर व्हावा यासाठी कार घेतात. कारमध्ये अनेक चांगले आणि प्रीमियम प्रकार उपलब्ध आहेत. कारचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी नवीन फिचर्सदेखील लाँच केले जातात.

तुम्हाला लाँग ड्राईव्हला जायचे असेल तर तुम्ही खासगी कारचा पर्याय निवडता. अनेकदा लाँग ड्राईव्हला गेल्यावर सतत कार चालवल्याने थकवा जाणवतो. त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतात. यासाठी तुमच्या कारमध्ये काही फीचर्स असतात. कारमधील काही फीचर्स तुम्हाला आरामदायी प्रवासासाठी उपयोगी ठरतात. अशाच काही फीचर्सची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

1. कूलिंग सीट्स

भारतात 2019 पासून कूलिंग सीट्सची पद्धत कारमध्ये सुरु झाली आहे. कूलिंग सीट्समुळे व्हेंटिलेशन कायम राहते. एअर कंडिशनर शिवाय ड्रायव्हरला ठंडपणा मिळतो. त्यामुळे ड्रायव्हारला कार चालवताना खूप छान आणि आरामदायी वाटते.

2. क्रूझ कंट्रोल

क्रूझ कंट्रोल हे फीचर प्रीमियम कारमध्ये उपलब्ध असते. क्रूझ कंट्रोलमुळे गीअर न बदलता तुम्ही कार चालवू शकता. यामुळे लाँग ड्राईव्हला गेल्यावर तुम्हाला चांगला अनुभव मिळेल. यामुळे तुमचा वेळ आणि मेहनत दोन्ही वाचते. परंतु हे फीचर तुम्ही फक्त महामार्गावर वापरु शकतात.

3. मसाज चेअर

भारतात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कार उपलब्ध आहेत. यात प्रीमियम कारमध्ये मसाज चेअर हे फीचर उपलब्ध असते. लांबचा प्रवास सुखकर व्हावा आणि थकवा जाणवू नये यासाठी हे फीचर आहे. काही कारमध्येच हे फीचर उपलब्ध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोण राज ठाकरे- वाकरे...; राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरील टीकेनंतर प्रफुल पटेल भडकले, VIDEO

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार यांनी घाई केली, ही गोष्ट खरी: आमदार चिखलीकर

Valentine's Day Gifts: व्हॅलेंटाईन डे करा स्पेशल यावेळी तुमच्या बॉयफ्रेंड किंवा नवऱ्याला द्या या युनिक गिफ्ट्स

राज्यातील शिक्षकांची निवडणूक ड्युटी रद्द; जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाचा मोठा निर्णय

Manipur Politics: युमनाम खेमचंद सिंह होणार नवे मुख्यमंत्री; एका वर्षानंतर हटणार मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट

SCROLL FOR NEXT