Car Free Place Saam Tv
लाईफस्टाईल

Car Free Place : 'या' ठिकाणी कार चालवण्यास बंदी, येथील लोकांचे जीवन तर असहाय्य

शहरात राहणारे बहुतेक लोक प्रवासासाठी त्यांच्या दुचाकी किंवा कारचा वापर करतात.

कोमल दामुद्रे

Car Free Place : कोणत्याही ठिकाणी वेळेत पोहचण्यासाठी आपण कार किंवा दुचाकीचा वापर करतो. हल्ली नवनवीन कार व दुचाकीचे क्रेझ लोकांना प्रचंड आहे. शहरात राहणारे बहुतेक लोक प्रवासासाठी त्यांच्या दुचाकी (Bike) किंवा कारचा वापर करतात. आजच्या काळात कार किंवा बाईक ही गरज बनली आहे पण तुम्ही कधी विचार केला आहे का की अशी कुठलीही जागा असेल जिथे लोकांकडे कार नसेल.

हे ऐकून आश्चर्य वाटेल की, जगात अशी काही ठिकाणे आहेत जिथे कार चालवण्यास मनाई आहे. या लेखात आम्ही तुम्हाला या ठिकाणांबद्दल सांगणार आहोत.

1. मॅकिनॅक बेट

Mackinac Bridge

मॅकिनॅक बेटावर कोणत्याही व्यक्तीला कार (Car) चालवण्याची परवानगी सरकारने दिलेली नाही. येथे लोक घोड्यावर बसतात किंवा सायकल वापरून प्रवास ठरवतात. 1898 मध्ये, या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी या कारणास्तव येथे राहणाऱ्या लोकांना कार चालवण्यास मनाई केली होती जेणेकरून घोड्यांना संरक्षण मिळावे. हे निर्बंध अजूनही आहेत आणि त्यामुळे आजही लोक गाडीचा वापर करत नाही.

2. गिथॉर्न

Giethoorn

गिथॉर्नमध्ये कुठेही प्रवास करण्यासाठी लोक बोटींचा वापर करतात. येथे मोटारींना बंदी असल्याने लोक या ठिकाणी कार वापरू शकत नाहीत. हे ठिकाण अतिशय शांत आणि सुंदर आहे. येथील लोक बोटीमध्येच मोठ्या आवाजात हॉर्न वाजवतात. या ठिकाणी तुम्हाला इतर वाहने क्वचितच दिसतील.

3. इटली

Italy

इटलीमधील व्हेनिसमध्ये कार चालवण्यास परवानगी नाही. या ठिकाणी रस्ता नाही. येथे लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बोटी आणि वॉटर बसचा वापर करतात, आम्ही तुम्हाला सांगतो की या ठिकाणी अनेक कालवे आहेत. यासोबतच लोक येथे सुट्टी साजरी करण्यासाठी येतात.

4. बाल्ड हेड बेट

Bald Head Island

बाल्ड हेड आयलंडमध्ये प्रवास करण्यासाठी लोक इलेक्ट्रिक गोल्फ कार्ट आणि सायकली वापरतात. हे ठिकाण गोल्फ कोर्स आणि प्राचीन समुद्रकिनाऱ्यांच्या मध्ये वसलेले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की या ठिकाणाच्या सौंदर्याबद्दल अनेक चर्चा आहेत. त्याच वेळी, हे एक अतिशय शांत ठिकाण मानले जाते कारण येथे जास्त वाहने वापरली जात नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT