hpv cancer risk google
लाईफस्टाईल

Cancer Risk Unmarried: लग्न न केल्यास कॅन्सरचा धोका वाढतो? संशोधनातून धक्कादायक सत्य समोर

Health Study: नवीन संशोधनानुसार अविवाहित व्यक्तींमध्ये कॅन्सरचा धोका जास्त असतो. पण तज्ज्ञांच्या मते, लग्न नाहीतर जीवनशैली,सवय आणि सामाजिक आधार हे खरे कारण आहे.

Sakshi Sunil Jadhav

नुकत्याच झालेल्या संशोधनात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामध्ये लग्न न केल्यास कॅन्सरचा धोका वाढतो का? असा प्रश्न चर्चेत आला आहे. Sylvester Comprehensive Cancer Center इथल्या संशोधकांनी जवळपास 40 लाख लोकांच्या डेटाचा अभ्यास करून एक महत्त्वाचा निष्कर्ष मांडलाय. या संशोधनानुसार, कधीच लग्न न केलेल्या पुरुष आणि महिलांमध्ये कॅन्सरचा धोका विवाहित लोकांच्या तुलनेत जास्त असल्याचं आढळलं आहे.

University of Miami Miller School of Medicine च्या अंतर्गत हे संशोधन करण्यात आले आहे. हे संशोधन Cancer Research Communications या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. संशोधनात एचपीव्ही (HPV) संसर्गामुळे होणाऱ्या कॅन्सरचा धोका अविवाहितांमध्ये जास्त असल्याचं दिसून आलं. पुरुषांमध्ये गुदाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण हे पाचपट जास्त आढळलं, तर महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या (सर्व्हायकल) कॅन्सरचं प्रमाण तीनपट जास्त असल्याचं कळालं आहे.

तसेच धूम्रपान आणि मद्यपान यांसारख्या सवयींमुळे फुफ्फुस आणि अन्ननलिकेच्या कॅन्सरचं प्रमाणही अविवाहितांमध्ये जास्त असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. तसेच पोट, कोलोरेक्टल, लिव्हर, ओव्हेरियन आणि एंडोमेट्रियल कॅन्सरच्या घटनांमध्येही वाढ दिसून आली आहे.

या निष्कर्षांवरून “कॅन्सरपासून वाचण्यासाठी लग्न करणं आवश्यक आहे” असा अर्थ काढणं चुकीचं ठरेल, असं तज्ज्ञ म्हणतात. तज्ज्ञांच्या मते, लग्न ही थेट संरक्षण देणारी गोष्ट नाही, त्यामागची सामाजिक, आर्थिक आणि जीवनशैलीशी संबंधित घटक जास्त महत्त्वाचं असतात. विवाहित लोकांमध्ये रोजच्या रोज तपासणे आरोग्य तपासणे, लाइफस्टाइल आणि सामाजिक आधार जास्त असतो. त्यामुळे त्यांचा धोका तुलनेने कमी दिसू शकतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये मोकाट जनावरांमुळे 2 कारमध्ये भीषण अपघात, एकाचा मृत्यू

Pune Crime News : "विरोधी पार्टीचे स्टेट्स" ठेवल्याचा राग, पुण्यात मित्रांनीच केला मित्राचा घात

ममता बॅनर्जींचा भाजपला जोरदार धक्का; बार कौन्सिलच्या निवडणुकीत पराभव, फक्त ३ जागांवर विजय

NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणावरून सुप्रीम कोर्ट संतापले, एनटीएच्या कार्यक्षमतेवर उपस्थित केले सवाल

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी ई-केवायसीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतील १ कोटी लाभार्थ्यांचा ₹१५०० चा हप्ता बंद, महत्त्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT