कॅन्सर हा आजार भारतात वाढताना दिसत असल्याचे WHOचे म्हणणे आहे. हा आजार नेहमीच स्पष्ट लक्षणांसह समोर येतो असं नाही. अनेक वेळा तो शांतपणे शरीरात वाढत राहतो आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हा उशीर झालेला असतो. डॉक्टरांच्या मते, काही 'सायलेंट' म्हणजेच दुर्लक्षित राहणारे घटक आपल्याला नकळत कॅन्सरच्या आजारचे रुप घेत असतात. हे घटक वेळेत समजून घेतले आणि काळजी घेतली, तर मोठा धोका टाळता येऊ शकतो.
कॅन्सरचा धोका वाढवणारे सायलेंट घटक
१ शरीरात सुज असणे. (Chronic low-grade inflammation)
शरीरात जर सारखी सूज येत असेल. हे डॉक्टर तपासून सांगत असतील तर, ही ट्यूमरची लक्षणे असू शकतात. यामध्ये वाढतं वजन, मेटाबॉलिक सिंड्रोम, दात-हाडांच्या संसर्गजन्य आजारामुळे शरीरात सूज राहते आणि त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.
२ आतड्यांमधील जीवाणूंचे प्रमाण (Dysbiosis of gut microbiome)
आतड्यामध्ये काही चांगल्या जिवाणूंचे संतुलन बिघडलं तर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. यामुळे कोलन, लिव्हर, पॅन्क्रियाज यांसारख्या कॅन्सरचा धोका वाढतो.
३ अनुवांशिक कारणे (Genetic factors)
काही कॅन्सर हे आनुवंशिक असतात. म्हणजेच पालकांकडून मुलांकडे काही जीन्सच्या म्युटेशनमुळे ब्रेस्ट, कोलन यांसारख्या कॅन्सरची शक्यता जास्त असते.
४ लाइफस्टाईलमधील बदल (Lifestyle factors)
अनेकांच्या लाइफस्टाईल बदलत चालल्या आहेत. पौष्टीक ऐवजी लोक धूम्रपान, मद्यपान, जंक फूड, जास्त साखर, फॅटी फूड, झोपेची कमतरता ही जीवशैली झाली असल्यामुळे कॅन्सरचा धोका अशा व्यक्तींना जास्त असतो.
५ व्हायरसचा परिणाम (HPV इत्यादी)
काही व्हायरस, विशेषतः एचपीव्ही (HPV), डीएनएमध्ये बदल घडवून गर्भाशयमुखाच्या कॅन्सरला कारणीभूत ठरतात. तसेच वय वाढल्यामुळे पेशींमधील डीएनए चुका वाढतात आणि शरीर त्या दुरुस्त करू शकत नाही. त्यामुळे वृद्धावस्थेत कॅन्सरचा धोका जास्त असतो.
६ शारीरिक हालचालींचा परिणाम (Physical inactivity)
नियमित व्यायाम न करणाऱ्यांना लठ्ठपणा व मेटाबॉलिक समस्या होतात, ज्यामुळे अनेक प्रकारच्या कॅन्सरचा धोका वाढतो.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.