local train Saam Tv
लाईफस्टाईल

Indian Railways Rule: तिकीटाशिवाय रेल्वेने प्रवास करता येईल का? काय आहेत नियम? जाणून घ्या

Indian Railways: तिकीटाशिवाय रेल्वेने प्रवास करता येईल का? काय आहेत नियम? जाणून घ्या

साम टिव्ही ब्युरो

Indian Railways Rule:

प्रवास लांबचा असो वा जवळचा, अनेक लोक रेल्वेनेच प्रवास करण्यास पसंती दर्शवतात. त्यामागे अनेक कारणे आहेत, ज्यात आरामदायी सीट, एसीची सुविधा, खानपान सुविधा आणि टॉयलेट सुविधा यासह इतर गोष्टींचा समावेश आहे. जर तुम्हाला ट्रेनने प्रवास करायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी तिकीट बुक करावे लागेल. यातच अनेक मार्गांवर तुम्हाला काही महिने आधीच तिकीट बुक करावे लागेल.

मात्र सणासुदीच्या काळात अनेक वेळा तिकीट मिळणं अवघड होऊन जातं. याचं कारण म्हणजे अनेक लोक आधीच तिकीट बुक करतात, ज्यामुळे रेल्वेत आरक्षित जागा मिळत नाही. त्यामुळे कोणीही विना तिकीट ट्रेनमध्ये प्रवास करू शकतो का? याबाबत काही नियम आहे का? असा प्रश्न अनेकांना पडतो, याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जर तुम्ही विना तिकीट ट्रेनमध्ये प्रवास करताना आढळला तर, ते दंडनीय गुन्ह्याच्या श्रेणीत येते. भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, तुम्ही विना तिकीट प्रवास करताना पकडले गेल्यास, तुम्हाला दंड किंवा तुरुंगवास किंवा दोन्हीही होऊ शकतात. त्यामुळे हे करू नका.  (Latest Marathi News)

अशा प्रकारे तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करू शकता

जर तुम्हाला कधी अचानक एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी ट्रेनने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागले. पण जर तुमच्याकडे कन्फर्म तिकीट नसेल, तर तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीटाची मदत घेऊ शकता. त्यामुळे तुम्ही ते विकत घेऊन ट्रेनमध्ये चढू शकता.

ट्रेनमध्ये चढल्यानंतर, तुम्हाला सर्वातधी टीसीला भेटावे लागेल आणि काही कामामुळे अचानक प्रवास का करावा लागला हे सांगावे लागेल. मग टीसी तुम्हाला त्या ठिकाणचे तिकीट देऊ शकतो, जिथे तुम्हाला प्रवास करायचा आहे.

तुम्हाला तिकिटाचे पैसे टीसीला द्यावे लागतील. तसेच तुमच्याकडे कन्फर्म तिकीट नसल्याने तुम्हाला दंडही भरावा लागतो, परंतु असे करून तुम्ही तुमचा प्रवास सुरू ठेवू शकता. ट्रेनमध्ये एखादी जागा रिकामी असल्यास, तुम्ही टीसीशी बोलून ती मिळवू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धोनी, कोहली अन् सचिनची वार्षिक कमाई किती? आकडा पाहून बसेल धक्का; रवी शास्त्री म्हणाले..

Bitter Gourd Benefits In Monsoon : पावसाळ्यात खा कारलं, मिळवा आरोग्यदायी फायदे

Tejaswini Pandit: तेजस्वीनीचं सौंदर्य जणू गुलाबाचं फूल...

Non Sticky Makeup: पावसाळ्याच्या दिवसात तुमचा मेकअप देखील चिकट होतो, मग फॉलो करा या सोप्या ट्रिक्स

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात पावसाची रिपरिप; बळीराजा सुखावला

SCROLL FOR NEXT