Pitru Paksha Rituals Saam Tv
लाईफस्टाईल

Pitru Paksha Rituals: पितृपक्षात वाढदिवस साजरा करावा का? शास्त्र काय सांगते

Birthday During Pitru Paksha: पितृपक्षात वाढदिवस साजरा करावा का? शास्त्रानुसार जाणून घ्या योग्य माहिती. पितृपक्ष हा पूर्वजांच्या आशीर्वादाचा काळ आहे. वाढदिवस साजरा करणे अशुभ नाही तर शुभ आहे.

Manasvi Choudhary

पितृपक्षाविषयी अनेक समज- गैरसमज आहेत. पितृपक्षात काही गोष्टी करणं टाळलं जातं. यानुसार पितृपक्षात वाढदिवस साजरा करावा की नाही याविषयी सध्या चर्चा सुरू आहे. सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात पोस्ट समोर आली आहे. अनेकांनी यावर आपली मते सांगितली आहे.

असं मानलं जातं की, पितृपक्षात कोणतीही शुभ कार्ये करू नये. व्यवहार, प्रॉपर्टी, नवीन कपडे खरेदी करणं अशुभ मानलं जाते. मात्र पितृपक्षात वाढदिवस आला असेल तर तो करावा की नाही असा प्रश्न आहे.

वाढदिवस हा प्रत्येकासाठी खास दिवस असतो जो सर्वजण आनंदाने साजरा करतात शास्त्रानुसार, पितृपक्षाबद्दल नकारात्मकता असणे अत्यंत चुकीचे आहे. पितृपक्षाचा काळ हा पूर्वजांच्या आशिर्वादाचा काळ मानला जातो. ते आपल्याला आशीर्वाद देतात. म्हणून तुम्ही पितृपक्षात वाढदिवस साजरा करू शकतात ही चांगली गोष्ट आहे. कारण तुमच्या वाढदिवसा दिवशी तुम्हाला पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल. ते देखील तुमचेच पूर्वज आहे. तुमची वंशावळ आहे.

जर एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस पितृपक्षात येत असेल तर त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करावा. यादिवशी तुम्ही मंदिरात जाऊ शकता, दान करू शकता किंवा झाडे देखील लावू शकता. म्हणून जर तुमचा वाढदिवस पितृपक्षात येत असेल तर ते शुभ आहे. कारण या प्रसंगी तुम्ही तुमच्या कुटुंब आणि मित्रांसह तुमच्या पूर्वजांना आनंदा सहभागी करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बाहुले झाले आहे का? जयंत पाटलांची टीका

Rava Khobra Ladoo Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी रवा खोबरं लाडू

Raj Thackeray : ...अन् तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयोगावर राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडलं? VIDEO

BMC Recruitment : मुंबई महापालिकेत नोकरीची संधी; पगार ३०,००० रुपये; आजच करा अर्ज

Jio Special Offer: जिओचा डबल धमाका! एका प्लॅनसोबत दुसरा प्लॅन फ्री, काय आहे ऑफर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT