Cancer treatment saam tv
लाईफस्टाईल

Cancer treatment: शक्तीवर्धक गोळ्यामुळे कॅन्सरवर मात करता येणार, संशोधनात मोठं यश

Cancer research: नवीन संशोधनात व्हायग्रामधील सिल्डेनाफिल कॅन्सरच्या पेशींचा प्रसार कमी करण्यास मदत करू शकतो, अशी प्राथमिक शक्यता समोर आली आहे. मात्र हे संशोधन अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात असून मानवी क्लिनिकल चाचण्यांनंतरच ठोस निष्कर्ष काढता येतील.

Surabhi Jayashree Jagdish

व्हायग्रा (Viagra) हे नाव घेतलं की सर्वात आधी पुरुषांमधील इरेक्टाइल डिसफंक्शन (लैंगिक कमजोरी) यावरील औषध आठवतं. पण आता शास्त्रज्ञ या औषधाच्या आणखी एका उपयोगाचा अभ्यास करतायत. व्हायग्रामधील सिल्डेनाफिल हा घटक कॅन्सर शरीरात पसरू न देण्यासाठी मदत करू शकतो का, याचा शोध घेतला जातोय.

नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असं दिसून आलंय की, सिल्डेनाफिलमुळे कॅन्सरच्या पेशींना शरीराच्या इतर भागांमध्ये जाणं कठीण होऊ शकतं. कॅन्सर एका जागेवरून दुसऱ्या अवयवात पसरतो, त्या प्रक्रियेला मेटास्टॅसिस (Metastasis) असं म्हणतात. कॅन्सरमुळे होणाऱ्या बहुतांश मृत्यूंसाठी हीच प्रक्रिया जबाबदार असते. त्यामुळे कॅन्सरचा प्रसार रोखणारं औषध मिळाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरू शकतात.

यामध्ये तज्ज्ञांनी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केलीये. हे संशोधन अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे. आतापर्यंतचे बहुतांश प्रयोग प्रयोगशाळेत आणि प्राण्यांवर करण्यात आलेत. त्यामुळे हे औषध कॅन्सरवर प्रभावी आहे का, हे सांगण्यासाठी माणसांवर मोठ्या प्रमाणावर चाचण्या होणं अजून बाकी आहे.

संशोधनात नेमकं काय आढळलं?

हे संशोधन Cancer Research या जर्नलमध्ये प्रकाशित झालंय. संशोधकांनी पाहिलं की, सिल्डेनाफिल हे औषध कॅन्सरच्या पेशी थेट नष्ट करत नाही. पण त्या शरीरात पसरण्याची क्षमता कमी करतं. उंदीर आणि मानवी कॅन्सर पेशींवर केलेल्या अभ्यासात हा परिणाम दिसून आला.

संशोधनात असंही आढळलं की, सिल्डेनाफिलमुळे कॅन्सरच्या पेशींमधील कोलेस्ट्रॉल पेशीतील लायसोसोम नावाच्या छोट्या भागांमध्ये अडकून राहतं. त्यामुळे पेशींना आवश्यक तेवढं कोलेस्ट्रॉल मिळत नाही. कॅन्सरच्या पेशींना वाढण्यासाठी आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कोलेस्ट्रॉलची गरज असते. ते कमी मिळाल्यामुळे त्यांचा प्रसार मंदावू शकतो.

कॅन्सरचा प्रसार थांबवणं इतकं महत्त्वाचं का?

कॅन्सर सुरुवातीला एका ठिकाणी असताना अनेक वेळा त्यावर यशस्वी उपचार करता येतात. पण खरी अडचण तेव्हा सुरू होते, जेव्हा कॅन्सरच्या पेशी मूळ गाठीतून बाहेर पडतो. या पेशी रक्त किंवा लिम्फनोड्स यांच्यामार्फत शरीरातील इतर अवयवांमध्ये जसं की फुफ्फुसं, यकृत किंवा मेंदूपर्यंत पोहोचू शकतात. यालाच मेटास्टॅसिस म्हणतात.

एकदा कॅन्सर पसरला की त्यावर उपचार करणे अधिक कठीण होते. त्यामुळे कॅन्सरचा प्रसार रोखता आला, तर रुग्णाचे आयुष्य वाढण्यास मदत होऊ शकते आणि सध्या दिले जाणारे उपचारही अधिक चांगले काम करू शकतात.

सिल्डेनाफिल नेमकं कसं काम करतं?

सिल्डेनाफिल हे PDE5 नावाच्या एन्झाइमला रोखण्याचं काम करतं. हे औषध सध्या इरेक्टाइल डिसफंक्शन आणि पल्मनरी आर्टेरियल हायपरटेन्शन यासाठी वापरण्यात येतं. या आजारांमध्ये हे औषध शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतं.

पण या नव्या संशोधनात वेगळाच परिणाम दिसून आला. PDE5 ला रोखल्यामुळे कॅन्सरच्या पेशी कोलेस्ट्रॉलचा वापर नीट करू शकत नव्हत्या. कॅन्सरच्या पेशींना नवीन पेशी तयार करण्यासाठी आणि शरीरात पुढे जाण्यासाठी कोलेस्ट्रॉलची गरज असते. त्यामुळे त्याचा पुरवठा कमी झाल्यास कॅन्सरचा प्रसारही कमी होऊ शकतो.

यावरून असं दिसून आलं की, सिल्डेनाफिल रक्तप्रवाहावर परिणाम करण्यापेक्षा कॅन्सरच्या पेशींच्या काम करण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणत असावं.

भविष्यात हे कॅन्सरवरील औषध ठरू शकतं का?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, याची शक्यता नाकारता येत नाही. पण सध्या तरी असं म्हणणं योग्य ठरणार नाही. सिल्डेनाफिल हे शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन किंवा इम्युनोथेरपी यांसारख्या सध्याच्या उपचारांची जागा घेणार नाही. भविष्यात हे औषध या उपचारांसोबत दिल्यास कॅन्सरचा प्रसार कमी करण्यासाठी उपयोग होऊ शकतो.

संशोधकांनी काय सांगितलं?

इस्रायलमधील क्लॅलिट रिसर्च इन्स्टिट्यूटमधील वरिष्ठ तज्ज्ञ आणि या संशोधनाच्या सहलेखिका डॉ. समाह हायेक यांनी Healthline शी बोलताना सांगितलं की, त्यांनी कॅन्सर होण्यापूर्वी सिल्डेनाफिल वापरणाऱ्या मोठ्या गटाचा अभ्यास केला. मात्र हा अभ्यास विशिष्ट एका प्रकारच्या कॅन्सरपुरता मर्यादित नव्हता. त्यामुळे कोणत्या प्रकारच्या कॅन्सरमध्ये या औषधाचा जास्त फायदा होऊ शकतो, याबाबत सध्या ठाम निष्कर्ष काढता येत नाही.

त्यांनी आणखी सांगितलं की, या अभ्यासात बहुतेक सहभागी पुरुष होते. कारण सिल्डेनाफिल हे औषध मुख्यतः पुरुषांनाच देण्यात येतं. त्यामुळे महिलांमध्येही असेच परिणाम दिसतील का याबाबत अद्याप कोणतीही खात्री देता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड

Ladki Bahin Yojana : चुकीचा लाभ घेणार्‍या लाडक्या बहि‍णींवर सरकारची कारवाई, तुरुंगवासाची शक्यता, वाचा नेमकं कारण

गावरान पद्धतीची झणझणीत कोहळ्याची भाजी; एकदा खाल तर बोटं चाटत राहाल

Arun Govil Fees: १९८७ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारे 'श्रीराम'! २०२६ च्या 'रामायण'साठी अरुण गोविल यांनी किती फी घेतली?

सरकारी रुग्णालयात मोठा घोटाळा! बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात बड्या वैद्यकीय अधिकाऱ्याला अटक, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT