Morning routine: सकाळी उपाशी पोटी करा फक्त या 3 पदार्थांचं सेवन; दिवसभर शरीराला मिळेल भरपूर ऊर्जा

Surabhi Jayashree Jagdish

उर्जेची पातळी

सकाळची सुरुवात आपण काय खातो किंवा पितो याचा संपूर्ण दिवसाच्या ऊर्जा पातळीवर आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. रात्रीच्या उपवासानंतर शरीराला योग्य पोषण मिळाल्यास थकवा कमी होण्यास आणि फ्रेश वाटण्यास मदत होते.

Energy levels | saam tv

दिवसाची सुरुवात पाण्याने करा

सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम सुमारे २५० मिली पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. रात्री झोपेत शरीरातील काही प्रमाणात पाणी कमी झालेला असतं त्यामुळे पाणी प्यायल्याने शरीर पुन्हा हायड्रेट होण्यास मदत होते.

Healthy morning habits | saam tv

पाण्याची कमतरता

रिकाम्या पोटी पाणी पिण्यामुळे शरीरातील द्रवपातळी संतुलित राहण्यास मदत होते. योग्य हायड्रेशनमुळे अनेक शारीरिक प्रक्रिया सुरळीतपणे कार्य करतात. त्यामुळे सकाळपासूनच शरीर अधिक एक्टिव्ह राहण्यास मदत मिळू शकते.

Hydration | saam tv

हेल्दी फॅट्स

पाणी प्यायल्यानंतर एक चमचा शुद्ध खोबरेल तेलाचं सेवन करावं. या तेलामध्ये असलेले हेल्दी फॅट्स काही लोकांमध्ये जास्त वेळ पोट भरल्याची भावना निर्माण करण्यास मदत करू शकतात. त्यामुळे वारंवार भूक लागणे किंवा अनावश्यक खाण्याची इच्छा कमी होण्यास हातभार लागू शकतो.

Water benefits | saam tv

रक्तातील साखरेची पातळी

सकाळी हेल्दी फॅटचं सेवन केल्याने काही व्यक्तींमध्ये रक्तातील साखरेतील चढ-उतार कमी होण्यास मदत होऊ शकते. यामुळे दिवसभर ऊर्जा अधिक स्थिर राहण्यास हातभार लागतो.

Healthy fats

ब्लॅक कॉफी

त्यानंतर तुम्ही एक कप ब्लॅक कॉफी पिऊ शकता. ब्लॅक कॉफीतील कॅफीनमुळे एकाग्रता वाढण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे अनेकांना सकाळी अधिक उत्साही आणि सक्रिय वाटते.

Black coffee | saam tv

कॉफीतील पॉलीफेनॉल्सचे फायदे

ब्लॅक कॉफीमध्ये पॉलीफेनॉल्ससारखी अँटिऑक्सिडंट घटक आढळतात. हे घटक आतड्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करतात. मात्र, कॉफीचे प्रमाण मर्यादित ठेवणं आवश्यक आहे.

Caffeine | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Metabolism | saam tv

Cinnamon water: सकाळी सकाळी एक ग्लास प्या दालचिनीचं पाणी, मिळतील जबरदस्त फायदे

Morning drink | saam tv
येथे क्लिक करा