Constipation relief: बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यासाठी 'हे' 2 पदार्थ खा; काही मिनिटांत होतील आतडी साफ

Surabhi Jayashree Jagdish

बद्धकोष्ठता म्हणजे नेमकं काय?

कब्ज म्हणजे नियमित किंवा सहज मलत्याग न होणं. तसंच शौचासाठी जास्त जोर लावावा लागणं. दीर्घकाळ अशी समस्या राहिल्यास आतडी आणि गुदद्वाराशी संबंधित काही आजारांचा धोका वाढू शकतो.

Constipation relief | saam tv

वारंवार औषधांवर अवलंबून राहू नका

आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, कब्जासाठी सतत औषधं घेणं योग्य नाही. अशा औषधांची सवय लागल्यास नैसर्गिकरीत्या शौचास होण्याची क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे आहार, पाणी आणि व्यायामाच्या मदतीने समस्या कमी करण्यावर भर द्यावा.

Ajwain | saam tv

हाय फायबर आहार

धान्य, कडधान्यं, फळं आणि हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर तंतू असतात. जे पचनसंस्था सुरळीत ठेवण्यास मदत करतात. तंतुमय पदार्थांमुळे मल सहज बाहेर पडण्यास मदत होते. रोजच्या आहारात अशा पदार्थांचा समावेश केल्यास कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होऊ शकतो.

High-fiber diet | saam tv

ओवा आणि गूळ

रात्री झोपण्यापूर्वी एक छोटा चमचा ओवा आणि दोन छोटे चमचे किसलेला गूळ किंवा गुळाचा छोटा तुकडा एकत्र चावून खावा. त्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्यावं. काही तज्ज्ञांच्या मते हा उपाय काही दिवस केल्यास शौचास सुलभ होण्यास मदत मिळू शकते.

Fiber-rich foods | saam tv

भाजलेला ओवा

काही तज्ज्ञांच्या मते, ओवा आधी हलका भाजल्यास त्यातील घटक अधिक एक्टिव्ह होतात. त्यानंतर त्यात गूळ मिसळून खाल्ल्यास हा उपाय अधिक परिणामकारक ठरू शकतो. हे मिश्रण झोपण्यापूर्वी खाऊन त्यावर कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

Healthy digestion | saam tv

थायमॉल

ओव्यात थायमॉल (Thymol) नावाचं घटक असतं. जे पचनसंस्थेला कार्यरत ठेवण्यास मदत करतं. गूळ हा नैसर्गिक गोड पदार्थ असून तो आतड्यांमध्ये पाणी खेचण्यास मदत करतो त्यामुळे मल मऊ होऊन बाहेर पडण्यास मदत होते.

Digestive system | saam tv

योग्य जीवनशैली

बद्धकोष्टतेची समस्या कायमची टाळण्यासाठी केवळ घरगुती उपाय पुरेसे नसतात. संतुलित आहार, पुरेसं पाणी पिणं आणि नियमित व्यायाम यांचा दैनंदिन जीवनात समावेश करणं आवश्यक आहे.

Warm water | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Natural remedies | saam tv

Cinnamon water: सकाळी सकाळी एक ग्लास प्या दालचिनीचं पाणी, मिळतील जबरदस्त फायदे

Digestion | saam tv
येथे क्लिक करा