One Kidney yandex
लाईफस्टाईल

One Kidney : एका किडनीवर व्यक्ती जिवंत राहू शकतो का? जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं

One Kidney : एखाद्या किडनीला एक किडनी असेल तर जिंवत राहू शकते का? अशा व्यक्तींना जीवनात काही समस्या असतात का? जर तुमच्याही मनात असेल प्रश्न असतील तर जाणून घेऊया या प्रश्नांची उत्तरं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येक निरोगी व्यक्तीच्या शरीरात दोन किडनी असतात. मात्र अशा काही व्यक्ती असतात ज्यांना जन्मतः एक किडनी असते. तर काही व्यक्तींना वैद्यकीय समस्येमुळे एका किडनीवर आयुष्य काढावं लागतं. नुकतंच मुंबईतून एक प्रकरण समोर आलं, ज्यामध्ये कुटुंबातील चारंही जणांना एक-एक किडनी आहे. किडनी हा आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव मानला जातो. मात्र एक किडनी खराब झाली तर व्यक्ती जिंवत राहू शकते का? जाणून घेऊया याचसंदर्भातील काही प्रश्नांची उत्तरं.

एका किडनीवर कसं असतं व्यक्तीचं आयुष्य?

तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, ज्यांची एक किडनी खराब झाली आहे, त्यापैकी बहुतांश लोक एका किडनीवर सामान्य जीवन जगत आहेत. जर एक किडनी पूर्णपणे निरोगी असेल तर ती दोन किडनीप्रमाणे काम करते. मात्र प्रत्येक व्यक्तीसाठी असं होत नाही. ज्यावेळी एका किडनीवर भार असतो तेव्हा त्याचे नुकसान होण्याचा धोका वाढतो.

एका किडनीवर व्यक्ती जिवंत राहू शकतो?

जर एखादी व्यक्ती योग्य पद्धतीने जीवनशैली पाळत असेल आणि त्याची किडनी निरोगी असेल, तर तो एका किडनीवर संपूर्ण आयुष्य जगू शकतो. नॅशनल किडनी फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार, एखाद्या लहान मुलाची किडनी काढून टाकल्यास त्याला आयुष्यात काही समस्या येऊ शकतात. मात्र असं असलं तरीही तो त्याचं आयुष्ही सामान्यपणे जगू शकतो. एका किडनीवर जगण्यासाठी शरीर निरोगी ठेवणं गरजेचं आहे.

एक किडनी खराब असेल तर कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे?

  • आहार संतुलित ठेवणं गरजेचं

  • दारू आणि सिगारेट सोडून द्या.

  • बाहेर फिरायला जा आणि पायी चाला

  • पुरेसे पाणी प्या, जेणेकरून किडनीचं आरोग्य चांगलं राहतं

  • शरीराचं वजन अधिक वाढू देऊ नका.

  • नियमित व्यायाम केल्याने होईल फायदा

  • अधिक प्रमाणात मीठ किंवा खारट पदार्थ खाऊ नये.

  • बाहेरचे अन्नपदार्थ खाणं टाळलं पाहिजे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: कोणाकडूनही 'या' वस्तू फुकट घेऊ नका, संकटात याल

Sillod Assembly Election: भाजप आणि उद्धवसेनेचे सूर जुळले; ठाकरेंनीच दिली हाक

Jayant Patil : देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचा भाजपचा निर्धार; जयंत पाटील यांचा मोठा दावा

Chanakya Niti: या 3 सवयी असणाऱ्या व्यक्तीपासून कायम दूर राहा, आयुष्यात होईल पश्चात्ताप

Sillod News : सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT