Sleeping Problems Saam Tv
लाईफस्टाईल

Sleeping Problems : रात्रीच्या वेळी झोप येत नाही आहे ? 'या' गोष्टींचे सेवन करा अनेक समस्या होतील दूर !

Sleeping Disease : अनेक अशा व्यक्ती आहेत ज्यांना दिवसभर थकून सुद्धा रात्रीच्या वेळेला झोप येत नाही.

कोमल दामुद्रे

Sleeping Problems : अनेक व्यक्तींना रात्री झोपताना अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. दिवसभर तुम्ही जास्त काम करता तेव्हा तुम्हाला रात्रीच्या वेळी चांगली झोप येते.

परंतु, अनेक अशा व्यक्ती आहेत ज्यांना दिवसभर थकून सुद्धा रात्रीच्या वेळेला झोप येत नाही. अशा प्रकारच्या व्यक्तींच्या समस्यांवर आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. जेणेकरून रात्रीच्या वेळी झोप न येणे ही समस्या निर्माण होणार नाही.

चांगल्या आरोग्यासाठी जसा हेल्दी आहार महत्वाचा आहे तसेच रात्रभर 7 ते 8 तास झोप घेणे सुद्धा गरजेचे आहे. पूर्णपणे झोप न झाल्यामुळे अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. झोप पूर्ण झाल्यामुळे तुमचे ऑर्गन्स योग्य पद्धतीने काम करू शकत नाहीत.

अशातच झोप पूर्ण झाल्यामुळे तुमच्या शरीरामधील ऑर्गन्स योग्य पद्धतीने काम करतील आणि तुमचे ब्रेन फंक्शन देखील सुधारेल. त्याचबरोबर अनेक आजारांची समस्या कमी होण्यास मदत होईल. अशातच अनेक व्यक्तींना रात्रीच्या झोपेसाठी भरपूर कसरत करावी लागते. झोप पूर्ण न झाल्यामुळे लठ्ठपणा, वजन वाढणे आणि डिमेन्शिया या रोगांना सामोरे जावे लागू शकते.

1.नट्स :

नट्स आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. यामध्ये विविध प्रकारचे आणि गरजेचे व्हिटॅमिन्स (Vitamins) , मिनरल्स उपलब्ध असतात. ज्याच्या सेवनाने डायबिटीज आणि यासंबंधीच्या आजारांना कमी केले जाऊ शकते. नट्सचे सेवन केल्याने झोपेची क्वालिटी बूस्ट होते. कारण की याला मेलाटोनिनचे उत्तम स्त्रोत मानले जाते.

2. कॅमोमाइल टी :

कॅमोमाईल टी अँटिऑक्सिडंट ने भरपूर असते. इम्युनिटी वाढवून इंगज्यायटी स्ट्रेस कमी करते आणि सोबतच त्वचेच्या (Skin) हेल्थला देखील बूस्ट करते. अनेक स्टडीजच्या म्हणण्यानुसार यामध्ये उपलब्ध असणारे अँटिऑक्सिडेंट मस्तिष्क मधील रिसेप्टर्सला बढावा देते. जे तुमच्या झोपेला आणि नियंत्रित करते आणि झोप न येणे या समस्येला दूर करते.

3. भात (Rice) :

भातामध्ये फायबर, न्यूट्रिएंट्स आणि अँटिऑक्सिडंटचे गुण भरपूर प्रमाणात असतात. त्याचबरोबर भातामध्ये कार्ब प्रमाणात असते आणि जीआई इंडेक्स देखील हाय असते. रात्री झोपायच्या एक तास आधी भात खाल्ल्याने चांगली झोप येते.

4. चेरी :

चेरीमध्ये मेलाटोलिन उपलब्ध असते. जे शरीरामधील अंतरीकचक्राला नियमित ठेवण्यास मदत करते. एक्सपर्ट सांगतात की, झोपायच्या आधी एक मूठ भरून चेरीचे सेवन केल्यास तुम्हाला चांगली झोप लागू शकते. त्याचबरोबर चेरीचा ज्यूस करून देखील तुम्ही पिऊ शकता.

5. दूध (Milk) :

रात्रीच्या वेळी झोपण्याच्या आधी एक कप गरम दूध पिल्याने चांगली झोप लागू शकते. दुधामध्ये उपलब्ध असणाऱ्या काही पोषक तत्वांमुळे आपल्याला रात्रीची चांगली झोप येते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून मिळणार? तारीख काय? जाणून घ्या

Horoscope Today : शिव उपासना फलदायी ठरेल, तर कोणाला मिळेल नवी दिशा आणि नवीन मार्ग; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today: तूळ, कुंभ, मिथुन राशींच्या लोकांसाठी लकी दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी वाढली, थंडीचा कडाका जाणवणार; पंखे, कुलर, एसी बंद

Maharashtra Politics : भाजपला का हवेत फडणवीसच? संघही अनुकूल, आमदारांचाही पाठिंबा

SCROLL FOR NEXT