तुम्हाला दिवसा जास्त झोप येत असेल आणि कामाबद्दल उत्साह वाटत नसेल तर तुम्हाला सावधगिरी बाळगली पाहिजे. एका अभ्यासानुसार, दिवसा झोप येणे हे स्मृतिभ्रंश या आजाराचे प्रथमिक लक्षण असू शकते. या व्यतिरिक्त, या आजाराची इतर अनेक कारणे असू शकतात. दिवसा झोप येणे आणि स्मृतिभ्रंश यांच्यातील संबंध समजून घेऊया.
बऱ्याच लोकांना दिवसा झोपायची सवय असते. थकवा असो, ताणतणाव असो किंवा खराब दिनचर्या असो, यामुळे आपल्याला दिवसा झोप येते. परंतु तुम्हाला हे माहीत आहे का, दिवसा झोप येणं स्मृतिभ्रंश सारख्या गंभीर आजाराचे प्राथमिक लक्षण देखील असू शकते? नुकत्याच झालेल्या एका संशोधनात ही बाब समोर आली आहे.
दिवसा झोपल्याने होणारे नुकसान
दिवसा झोपणे हे शरीरासाठी नुकसान करार आहे. हे शास्त्रात आणि आयुर्वेदात ही सांगितले आहे. आयुर्वेदानुसार, दिवसा झोपल्याने सर्दी - पडसे होऊ शकतात. ही सर्दी ज्यास्त काळ राहिल्यास नंतर कफ होतो आणि कफ मुळे श्वसनाचे आजार होतात.
स्मृतिभ्रंश म्हणजे काय?
स्मृतिभ्रंश हा एक असा विकार आहे ज्यामध्ये व्यक्तीची विचार करण्याची, लक्षात ठेवण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता हळूहळू कमी होते. हे मेंदूच्या पेशींच्या नुकसानीमुळे होते. स्मृतिभ्रंश हा अल्झायमर रोगचा सामान्य प्रकार आहे.
स्मृतिभ्रंश झाल्यामुळे विसरणे आणि संवाद साधण्यात अडचण येते. स्मृतिभ्रंशाचे निदान करण्यासाठी आपण संज्ञानात्मक आणि न्यूरोलॉजिकल चाचण्या करू शकतो. विचार आणि शारीरिक कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या, या चाचण्यांमध्ये स्मृती, समस्या सोडवणे, भाषा कौशल्ये आणि गणित कौशल्ये, तसेच संतुलन, प्रतिसाद यांचा समावेश असतो.
स्मृतिभ्रंश चे लक्षणे
बोलण्यात अडचण येणे.
स्मरणशक्ती कमी होणे.
नवीन माहिती शिकण्यास समस्या येणे.
नावे आणि चेहरे आठवण्यास अडचण येणे.
स्वभाव बदलणे.
दिवसा झोप येणे आणि स्मृतिभ्रंश यांचा काय संबंध
जर्नल ऑफ न्यूरोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अलीकडील संशोधनात असे सूचित केले आहे की, दिवसा जास्त झोप लागणे हे स्मृतिभ्रंशचे प्राथमिक लक्षण असू शकते. दिवसा झोप न लागणे, कामात रस नसणे, कोणत्याही कामाबद्दल उत्सुकता नसणे, ही सर्व लक्षणे स्मृतिभ्रंशाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. स्मृतिभ्रंश रोखण्यात त्याची लक्षण लवकर ओळख महत्त्वाचे आहे. हे केवळ स्मृतिभ्रंशाचे निदान नाही तर या समस्येला इतरही अनेक घटक कारणीभूत असू शकतात.
या आजाराची लक्षणे आढळल्यास काय करावे?
डॉक्टरांशी संपर्क साधा - जर तुम्हाला दिवसा जास्त झोप येत असेल आणि स्मृतिभ्रंशाची इतर लक्षणेही दिसत असतील तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा.
चाचण्यांची तपासणी करा - तुमची लक्षणे आणि वैद्यकीय इतिहासावर अवलंबून डॉक्टर चाचण्या करू शकतात.
निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा - नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप यामुळे तुमचे मन निरोगी राहू शकते.
तणाव व्यवस्थापन - तणावामुळे स्मृतिभ्रंश होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे ताण व्यवस्थापन तंत्राचा सराव करा.
Edited By - Archana Chavan