Call Recording  Yandex
लाईफस्टाईल

Call Recording : तुमचा कॉल कोणी रेकॉर्ड करतंय का? 'या' आवाजाने येईल ओळखता, वाचा सविस्तर

Call Recording : कॉल रेकॉर्ड होतोय का ते कसे शोधता येईल? हे जाणून घेऊ?

Bharat Jadhav

Call Recording :

आजकाल बहुतेक कामे फोनवर केली जातात. कोणाला काही माहिती द्यायची असेल किंवा काही सुचना द्यायची असेल तर आपण फोन कॉल करून सांगत असतो. या सर्व कामे मोबाईलवर होत असताना कॉल रेकॉर्डिंग आणि फोन टॅपिंगची समस्या निर्माण झालीय. फोन कॉलवर अनेकजण वैयक्तिक जीवनाविषयी बोलत असतात, अशात कॉल रेकॉर्ड झाला तर अनेकजण त्याचा गैरफायदा घेत असतात.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अनेकवेळा ऑडिओ टेप लीक होतात, त्यामुळे लोकांना मानसीक त्रासाला सामोरे जावे लागते. यामुळे आज आपण फोन टॅपिंग आणि कॉल रेकॉर्डिंग म्हणजे काय हे समजून घेऊ. कॉल रेकॉर्ड होतोय का ते कसे शोधता येईल का हे जाणून घेऊ?

कॉल रेकॉर्डिंग ही अतिशय सोपी प्रक्रिया आहे. यामध्ये फोनवर बोलणारी व्यक्ती तुमचे संभाषण रेकॉर्ड करू शकते. यामध्ये कॉल रेकॉर्डिंग अॅप्सचा वापर करण्यात येतो. मात्र कॉल रेकॉर्डिंग अॅपवर बंदी घातल्यानंतर इतर कॉल रेकॉर्डिंगच्या घटनांवर आळा घालण्यात येत आहे. जेव्हा कॉल रेकॉर्ड केला जातो, तेव्हा एक बीप सिग्नल येतो.

फोनवर संभाषण सुरू असताना तुम्हाला बीपचा आवाज आला तर समजून घ्या की, तुमचा कॉल रेकॉर्ड होतोय. तर दोन व्यक्तींमधील संभाषण कोणी तिसरी व्यक्ती ऐकते तेव्हा त्याला फोन टॅपिंग म्हणतात. फोन टॅपिंगसाठी इंजिनिअर्सची गरज असते. हे टेलिकॉम कंपन्यांना रेकॉर्ड केले जाऊ शकते. तसेच न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हेगारांना पकडण्यासाठी सरकार फोन टॅपिंगचा अवलंब करते. फोन टॅपिंग ओळखणे खूप कठीण आहे. हे प्रोफेशन पद्धतीने केलं जातं. यामुळे फोन टॅपिंग सहज ओळखणे कठीण असतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune : उन्हाळी सुट्टीत घरी जाणाऱ्यांसाठी खुशखबर, मुंबई-पुण्यातून तब्बल १४८४ स्पेशल ट्रेन धावणार

Oil Tanker: भारताला मोठा दिलासा! ईराणी 'चक्रव्यूह'ला भेदून मुंबईत पोहचलं कच्च्या तेलाचे पहिले जहाज; पाहा VIDEO

Viral Video: धक्कादायक! धावत्या ट्रेनमध्ये विदेशी महिलेसोबत असभ्य वर्तन, बाथरूमपर्यंत पाठलाग अन्....

Homemade Facepacks: उन्हाळ्यात चेहऱ्यावरचे पिंपल्स कसे काढायचे? हे 5 घरगुती फेसपॅक नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update: घमुंबई-नागपूर महामार्गावर कारने चौघांना उडवलं

SCROLL FOR NEXT