Home Remedies google
लाईफस्टाईल

Home Remedies: किचनमध्ये गरम तव्याचा चटका बसला? तातडीने 'या' गोष्टी करा, जळजळीपासून मिळेल आराम

Home Remedies: किचनमध्ये दैनंदिन काम करताना चुकून अनेक वेळा हाताला चटका बसण्याचा धोका असतो. अशावेळी गरम कुकर, तवा किंवा तव्याला हात लागल्याने जळजळ होते आणि हात लाल होतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

किचनमध्ये काम करताना अनेकदा आपल्याला दुखापत होते. कधी काही चिरत असताना बोट कापलं जातं तर कधी गरम भांड्याचा चटका लागतो. चटका लागण्यामागे अजून एक कारण असतं ते म्हणजे, गरम तवा.

किचनमध्ये दैनंदिन काम करताना चुकून अनेक वेळा हाताला चटका बसण्याचा धोका असतो. अशावेळी गरम कुकर, तवा किंवा तव्याला हात लागल्याने जळजळ होते आणि हात लाल होतो. जर तुम्हाला दररोज अशा प्रकारे किरकोळ भाजलं जात असेल तर आजीच्या बटव्यातील काही सोपे उपाय तुमच्या कामी येतील.

जर चटका लागल्याने तुम्हाला भाजलेल्या ठिकाणी जळजळ होतल असेल तर त्या ठिकाणी व्हाच्या पिठात दही मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट जखम झालेल्या भागावर लावा. यामुळे त्वचेवरील जळजळीपासून आराम मिळतो.

पाण्याने धुवा

चटका लागल्यानंतर जर तुम्हाला किरकोळ भाजलं असेल तर ताबडतोब जखमी भाग वाहत्या पाण्याकाखी धरावा. असं केल्याने जळजळ कमी होते. तसंच थोडा आराम मिळतो. पण हे काम थोडा वेळ न करता साधारण ५-१० मिनिटं सतत पाणी टाकत राहा.

खोबरेल तेल लावा

जर तुम्ही वाफेने चटका बसला असेल आणि भाजलेली जागा लाल झाली नसेल तर जागा पाण्याने धुवा, कोरडी करा आणि खोबरेल तेल लावा. यामुळे जळजळ कमी होण्यास मदत होते. याशिवाय फोड देखील येत नाहीत.

एलोवेरा जेल लावा

थंड रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेले केमिकल फ्री एलोवेरा जेल लावल्याने जळजळ होण्यापासून आराम मिळतो. हे घरगुती उपाय सौम्य जळजळ होण्यापासून तात्काळ आराम मिळण्यास मदत होऊ शकते.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गणरायाच्या आगमन आणि विसर्जनाच्या दिवशी पुणे जिल्ह्यात "ड्राय डे" घोषित

Parineeti Chopra: परिणीती चोप्रा-राघव चड्ढाच्या घरी येणार नवा पाहुणा; क्यूट स्टाईलमध्ये दिली गुड न्यूज

Accident News : लातूरमध्ये कारची दुचाकीला जोरात धडक, ३ तरूणांचा जागीच मृत्यू

Bindusara Dam : बीडकरांची चिंता मिटली; मुसळधार पावसात बिंदुसरा धरण ओव्हर फ्लो

ठाकरेंचा भाजपाला धक्का; रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत महिला नेत्यानं हाती घेतली मशाल

SCROLL FOR NEXT