Budh Gochar Saam tv
लाईफस्टाईल

Budh Gochar : बुध संक्रमणात विष्णु लक्ष्मी शुभ संयोग! या राशींना लागणार लॉटरी, मिळेल भरमसाट पैसा

कोमल दामुद्रे

Laxmi Vishnu Shubh Yog : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात ग्रह हे राशी परिवर्तन करत असतात. ज्याचा आपल्या आयुष्यावर चांगला वाईट परिणाम होत असतो. अशातच २५ जुलैला बुध ग्रह हा सिंह राशीत संक्रमण करणार आहे. ज्यामुळे लक्ष्मी विष्णु शुभ योग तयार होत आहे.

बुध ग्रह हा संपत्ती, व्यवसाय, बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, संवाद, वाणीचा कारक म्हणून ओळखला जातो. ज्या लोकांच्या कुंडलीत बुध शुभ असतो ते अतिशय बुद्धिमान, संभाषणात निपुण आणि तर्कशास्त्रात पारंगत असतात. जाणून घेऊया या बुधच्या संक्रमणांमुळे कोणत्या राशींना शुभ फले मिळणार आहेत.

1. मिथुन :

मिथुन राशीच्या लोकांना त्यांचे ध्येय साध्य करण्यात यश (Success) देईल. ते जे काही काम हातात घेतील ते पूर्ण करू शकतील. जीवनात अनेक सकारात्मक बदल होतील. प्रॉपर्टी-कार खरेदी करता येईल. नवीन नोकरी (Job) मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. व्यवसायात यश मिळेल. शत्रूंचा पराभव होईल. गुंतवणुकीतून लाभ होईल.

2. सिंह :

बुध गोचर सिंह राशीत प्रवेश करत आहे आणि या राशीच्या लोकांना चांगला लाभ होईल. या लोकांची कोणतीही मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. तुमचा प्रभाव वाढेल. काही महत्त्वाचे काम करण्यात यशस्वी व्हाल. धनलाभ होईल. व्यावसायिकांसाठी (Business) हा काळ विशेष फायदेशीर राहील.

3. तूळ :

शुक्र हा तूळ राशीचा स्वामी आहे आणि बुध हा अनुकूल ग्रह आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठीही बुधाचे संक्रमण शुभ राहणार आहे. घरच्यांच्या मदतीने एखादे प्रलंबीत काम पूर्ण होऊ शकते. परदेशात नोकरी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. इच्छित पद आणि पैसा मिळाल्याने खूप आनंद होईल. नवीन व्यवसाय सुरू करू शकता.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मासिक पाळीविषयीचे समज आणि गैरसमज, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं, वाचा सविस्तर!

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

SCROLL FOR NEXT