Budh Gochar 2024 Saam Tv
लाईफस्टाईल

Budh Gochar 2024 : बुध ग्रहाचे कुंभ राशीत संक्रमण! ४ राशींच्या करिअरमध्ये होणार मोठे बदल, प्रेमीयुगुलांच्या नात्यात येईल गोडवा

Budh Gochar Horoscope : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे संक्रमण हे विशिष्ट वेळेनुसार होत असते. प्रत्येक ग्रहाचे विशेष असे महत्त्व आहे. अशातच २० फेब्रुवारीला बुध ग्रहाने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे बुधादित्य राजयोग तयार झाला आहे.

कोमल दामुद्रे

Budh Gochar In Kumbh Rashi 2024 :

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे संक्रमण हे विशिष्ट वेळेनुसार होत असते. प्रत्येक ग्रहाचे विशेष असे महत्त्व आहे. अशातच २० फेब्रुवारीला बुध ग्रहाने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे बुधादित्य राजयोग तयार झाला आहे.

कुंभ राशीमध्ये सूर्य आणि बुध यांचा संयोग तयार होत आहे. तसेच शनिदेवाने कुंभ राशीत प्रवेश केल्यामुळे शश राजयोग तयार होईल. कुंभ राशीतील ग्रहांचा हा दुर्मिळ संयोग अतिशय खास मानला जातो. कुंभ राशीत बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे काही राशीच्या करिअरमध्ये (Career) मोठे बदल होतील. तर काही राशीच्या लोकांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जाणून घेऊया बुध ग्रहाचा कुंभ राशीत संक्रमण झाल्यानंतर कोणत्या राशींना फायदा होणार आहे.

1. मेष

नवीन आयडीच्या जोरावर कामात यश (Success) मिळेल. व्यावसायिक जीवनातील समस्या सोडवाल. मानसिक आरोग्याकडे (Health) विशेष लक्ष द्या. आव्हानात्मक कामांना घाबरु नका. कामात शिस्तबद्घता येईल.

2. मिथुन

कामानिमित्त परदेशात जाण्याची शक्यता आहे. शैक्षणिक कार्यात चांगले यश मिळेल. धार्मिक कार्यात अधिक रुची राहिल. बुधाच्या संक्रमणामुळे कामाच्या ठिकाणी वैचारिक मतभेद निर्माण होईल. मत मांडण्यास अजिबात संकोच करु नका. इतरांच्या मतांचाही आदर करा.

3. कन्या

कामाचे अपेक्षित परिणाम मिळतील. ऑफिसमध्ये तुमच्या समस्या सोडवण्याच्या कौशल्याने प्रशंसा होईल. मल्टी-टास्किंग कौशल्यांसह तुम्ही सर्व कामे वेळेत पूर्ण कराल. वैवाहिक जीवनात गोडवा येईल. कामाचा जास्त ताण घेऊ नका.

4. कुंभ

कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. नवीन गोष्टी शिकाल. वाचन आणि लिखाणाला अधिक वेळ द्याल. ऑफिसमध्ये कामामुळे जास्त ताण घेऊ नका. नियमितपणे ध्यान करा. मानसिक आरोग्य सुधारेल. बुध संक्रमणामुळे शैक्षणिक कार्यात तुमची आवड वाढेल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT