Budh Gochar 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Budh Gochar 2023 : मेष राशीत बुधाचे संक्रमण ! या 5 राशींच्या कष्टाचं होईल चीज; अपूर्ण इच्छा होतील लवकरच पूर्ण...

Budh In Kundali : ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला राजा म्हटले जाते. जर कुंडलीतील बुध ग्रह अधिक बलवान असेल

कोमल दामुद्रे

Mercury Transit in Aries : ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला राजा म्हटले जाते. जर कुंडलीतील बुध ग्रह अधिक बलवान असेल तर ती व्यक्ती खूप हुशार, बोलण्यात तरबेज व व्यापारी असेल. तर्कशक्ती आणि संवादाची शैली अप्रतिम असते. तसेच जर बुध कमजोर असेल तर पैशांच्या अनेक अडचणी येतील, इच्छा अपूर्ण राहातील.

यावेळी बुधाचे मेष राशीत संक्रमण होत आहे. यामुळे या 5 राशींना त्याच्या फायदा होणार आहे. ७ जून नंतर बुधाचा वृषभ राशीत प्रवेश होणार आहे. त्यामुळे नोकरी (Job) व व्यवसायात अधिक प्रगती कराल. अपूर्ण इच्छा पूर्ण होतील. येत्या १५ दिवसांत कोणत्या राशींना फायदा होणार आहे. कोणत्या राशी अधिक प्रगती करणार आहेत तसेच कोणत्या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये उच्च पद, पैसा (Money), पदोन्नती मिळू शकते. जाणून घेऊया त्याबद्दल

1. मिथुन:

येत्या ७ जूनपर्यंत मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. ज्यामुळे त्याची प्रगती देखील होईल. अचानक धनलाभ देखील होणार आहे. ज्यामुळे ते बचतीचा नवामार्ग स्वीकारतील. अपूर्ण राहीलेली इच्छा देखील पूर्ण होणार आहे. ज्यामुळे तुमचे जुने नातेसंबंध (Relationship) अधिक चांगले होतील

2. कर्क :

कर्क राशीच्या लोकांसाठी बुधाच्या गोचरामुळे हा काळ त्यांच्या करिअरमध्ये फायदेशीर ठरू शकतो. नवीन संधी मिळतील. नोकरी बदलू शकते. तुम्हाला बढती-वाढ मिळू शकते. नवीन व्यवसाय सुरू करू शकता. करिअरमध्ये यश मिळवू शकता. लांबच्या प्रवासाला जाता येईल.

3. सिंह:

बुधाच्या गोचरमुळे सिंह राशीच्या लोकांना भरपूर पैसा आणि यश मिळेल. बुद्धीच्या जोरावर काम मिळेल. भाग्य तुमच्या सोबत राहील. कोणत्याही महत्त्वाच्या कामात यश मिळू शकते. इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुम्ही प्रवासात पैसे खर्च कराल पण चांगली कमाई केल्याने बजेटवरही लक्ष ठेवाल.

4. धनु :

धनु राशीच्या लोकांना वैयक्तिक-व्यावसायिक जीवनात आणि आर्थिक बाबतीत शुभ परिणाम मिळेल. करिअरमध्ये मोठा फायदा होऊ शकतो. परीक्षा-स्पर्धेत यश मिळेल. नवीन नोकरीच्या संधी मिळतील. बेरोजगारांना रोजगार मिळेल. अविवाहित लोक लग्न करण्याचा निर्णय घेऊ शकतात.

5. कुंभ :

कुंभ राशीच्या लोकांना बुध नवीन संधी देईल. नवीन नोकरीत सहभागी होऊ शकता. सध्याच्या नोकरीत तुम्हाला बढती, वेतनवाढ मिळू शकते. प्रवासाची योजना बनवता येईल ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. वडिलांशी संबंध चांगले राहतील आणि कुटुंबाचा तुम्हाला खूप पाठिंबा देतील.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan Tourism : संगमेश्वरमध्ये लपलेले सुंदर रत्न, निसर्ग सौंदर्याने सजलाय 'हा' धबधबा

ट्रॅफिक चालान न भरल्यास आरसी रद्द, लायसन्स होणार सस्पेंड; सरकार नवीन नियम करणार लागू

Sleep Disorder: झोपमोड होते अन् रात्री सतत जाग येतेय? असू शकतो या जीवघेण्या आजाराचा धोका, वेळीच व्हा सावध

श्रीकांत शिंदेंनी वय काढलं, गणेश नाईकांनी बाप काढला; म्हणाले, माझ्यासोबत अर्धा तास चालायला सांग....VIDEO

Maharashtra Live News Update : विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपुरात रोड शो

SCROLL FOR NEXT