Ganpati Decoration Ideas Saam TV
लाईफस्टाईल

Ganpati Decoration Ideas : कमी खर्चात सोप्या पध्दतीने बनवा, गणपतीचे सुंदर असे डेकोरेशन !

गणपतीच्या डेकोरेशनसाठी काही सोप्या टिप्स

कोमल दामुद्रे

Ganpati Decoration Ideas : गणेश उत्सव सुरु होण्यात अवघे काही दिवस सुरु आहे. हल्ली गणपती प्रत्येकाच्या घरोघरी आपल्याला पाहायला मिळतात.

गणपती (Ganpati) येण्याची वाट आपण सारे आतुरतेने पाहात असतो. त्याच्या तयारीत आपण अधिक मग्न असतो. या दिवसात आपण गणपतीच्या आवडचे पदार्थ बनवत असतो. परंतु, सगळ्यात जास्त चिंता वाटते ते त्याचे डेकोरेशन कसे करायचे ?

हल्ली बाजारात तयार डेकोरेशन सहज मिळते परंतु, त्याचे खर्च आपल्याला परवडणारा नसतो. अशा परिस्थितीत, दरवर्षी लोक नवीन थीम आणि त्यांचे घर सजवण्यासाठी नवीन मार्ग शोधतात. तुम्हालाही यंदाच्या गणेशोत्सवासाठी तुमचे घर (Home) सजवायचे असेल, तर गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी काही टिप्स (Ganpati Decoration Ideas In Marathi)

१. झाडांनी व फुलांनी सजवा -

आपण आपल्या घराला व गणपती ज्या ठिकाणी बसणार आहे त्या ठिकाणाला आपण सुंदर फुलांच्या माळेने सजवा. ज्यामुळे आपल्या घराला निसर्गाचा सुंदर लुक मिळेल व घर प्रसन्न देखील वाटेल.

२. भिंतींना सजवा-

गणपतीच्या दरम्यान आपण घराला पारंपारिक लूक देतो परंतु, यंदा आपण घराला फुलांनी सजवल्यानंतर काही नवीन ट्राय करा. आपण घरातील भिंतींना काही युनिक किंवा अध्यात्मिक फोटो लावायला हवा.

३. पूजेचे ताट -

आपण वर्षानुवर्षे तेच पूजेचे ताट वापरत असू तर आपण त्यात थोडा बदल करु शकतो. ज्यामुळे आपल्या डेकोरेशनचा लूक वेगळा दिसेल. बाजारात नवनवीन प्रकारचे ताट मिळते ज्यामध्ये आपण सगळे पदार्थ एकत्र ठेवू शकतो. तसेच आरतीचे ताट देखील आपण आपल्या डेकोरेशनला शोभेल या प्रमाणे आणू शकतो.

Ganpati Decoration Ideas

४. घरच्या घरी गणेशाची मूर्ती बनवा -

आपण दरवर्षी गणपतीची मूर्ती बाजारातून विकत आणत असू तर यंदा काही नवीन करण्यासाठी आपण गणेश मूर्ती घरी बनवू शकतो. मातीने किंवा घरात असणाऱ्या इतर वस्तूने आपण ही मूर्ती बनवू शकतो. ज्यामुळे निसर्गाचे संवर्धन देखील होईल.

५. फुले, मेणबत्त्या, दिवे आणि स्ट्रिंग लाइट्सने सजवा -

कोणताही धार्मिक सण फुल आणि रोषणाईशिवाय अपूर्ण असतो. या गणेशोत्सवात आपण पूजेची खोली आणि मंडप नवीन व सुंदर फुलांनी सजवू शकता. यासह, मेणबत्त्या, दिवे आणि स्ट्रिंग लाइट्ससह, आपण आपल्या पूजेच्या घराला एक अतिशय आकर्षक रूप देऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Marathi Movie: 'वाढलेलं वय अन् लग्नाची जुळवणी', सुबोध भावे अन् तेजश्रीनं घातला घाट; ट्रेलरने उत्सुकता वाढवली

MNS Manifesto: आम्ही हे करु! गडकिल्ले, रोजगार ते महिलांची सुरक्षा, मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध!

Diabetes symptoms: योनीमार्गात जखम किंवा संसर्ग असल्यास असू शकतं मधुमेहाचं लक्षण!

Sanjay Raut News : गद्दारासाठी पक्षाचं अधःपतन केल्याने त्यांना वैफल्य आलंय; संजय राऊतांचा फडणवीसांवर प्रतिहल्ला

Journey Marathi Movie : अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या 'जर्नी' चित्रपटाचा थरार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

SCROLL FOR NEXT