BSNL
BSNL 
लाईफस्टाईल

BSNL फुलझडी, बुलेट बाॅम्ब फेस्टिव्ह Offer या तारखेपर्यंत वैध

Siddharth Latkar

सातारा : दिवाळी सणाच्या पार्श्वभुमीवर भारत संचार निगम लिमिटेडने ग्राहकांसाठी विशेषत: युवा वर्गासाठी इंटरनेट डाटाच्या विविध सवलती बाजारात आणल्या आहेत. यामध्ये दरराेज पाच जीबी इंटरनेट डाटापासून अमर्याद टाॅकटाईम देण्यात आला आहे. या व्हाॅउचर्समधील सवलती येत्या सहा नाेव्हेंबर पर्यंत लागू राहणार असल्याने ग्राहकांनी त्याचा फायदा घेण्यासाठी रिचार्ज खरेदी करावे असे आवाहन बीएसएनएलने केले आहे. bsnl festive offers with upto extra 30 days validity and internet data

बीएसएनएलने जाहीर केलेल्या सवलतींमध्ये फुलझडी, बिजली बाॅम्ब, अनार अशी नावे व्हाॅउचर्सला दिली आहेत. याबराेबरच १९९९ रुपयांच्या प्लॅन व्हाउचर ३० दिवसांची अतिरिक्त वैधता मिळेल. वार्षिक प्लॅनमध्ये ६०० जीबी इंटरनेट डाटा, अमर्यादित टाॅकटाईम, अमर्यादित गाणे बदलण्याच्या पर्यायासह विनामूल्य PRBT आणि EROS NOW सह ६० दिवसांसाठी लोकधुनचा समावेश आहे. ३६५ दिवसांसाठी मनोरंजन, सेवा अशा प्रकारे या प्लॅनमध्ये सणाच्या कालावधीत इतर फायद्यांसह ३९५ दिवसांची वैधता दिली जात आहे.

ही आहेत व्हाॅउचर्स आणि त्याचे फायदे

फुलझडी : ९७ रुपयांत १८ दिवसांसाठी अमर्याद टाॅकटाईम, दरराेज दाेन जीबी इंटरनेट डाटा, १०० एसएमएस माेफत.

बिजली बाॅम्ब : १९९ रुपयांत ३० दिवसांसाठी अमर्याद टाॅकटाईम, दरराेज दाेन जीबी इंटरनेट डाटा, १०० एसएमएस माेफत.

अनार : २४७ रुपयांत प्रीपेड प्लॅन ३५ दिवसांसाठी ५० जीबी हाय स्पीड इंटरनेट डाटा. ज्यानंतर स्पीड ८० केबीपीएस पर्यंत कमी होतो. अमर्याद टाॅकटाईम, १०० एसएमएस माेफत. (सहा नाेव्हेंबर पर्यंत रिचार्ज करणे अनिवार्य).

बुलेट बाॅम्ब : ४९९ रुपयांत ९० दिवसांसाठी दरराेज दाेन जीबी इंटरनेट डाटा, अमर्याद टाॅकटाईम, १०० एसएमएस माेफत. यामध्ये BSNL ट्यून आणि इरॉस नाऊ स्ट्रीमिंग फायदा.

डाटा राॅकेट : ५९९ रुपयांत ८४ दिवसांसाठी दरराेज पाच जीबी इंटरनेट डाटा, अमर्याद टाॅकटाईम, १०० एसएमएस माेफत. झिंग संगीतसह रात्रीच्या १२ ते पहाटे पाच पर्यंत अमर्याद इंटरनेट डाटा माेफत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

Lok Sabha election: मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

Gullak 4 Trailer: अन्नू गुप्ताची प्रेमकहाणी होणार सुरू; नव्या भागात काय असणार गुप्ता कुटुंबाचा वाद

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

SCROLL FOR NEXT