Brinjal Benefits  Saam Tv
लाईफस्टाईल

Brinjal And Diabetes : मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी वांग आहे रामबाण, अशा पद्धतीने खाल्ल्यास होईल फायदा !

Diabetes Health Tips : वांग्याची भाजी आणि वांग्याचे बनलेले भरीत संपूर्ण जगभरात खाल्ली जाते.

कोमल दामुद्रे

Brinjal Benefits : वांग ही एक सामान्य भाजी मानली जाते, परंतु अनेक व्यक्तींना वांग्याच्या भाजीची चव अजिबात आवडत नाही. अशातच वांग्याची भाजी आणि वांग्याचे बनलेले भरीत संपूर्ण जगभरात खाल्ली जाते.

वांगी हे हिरवे आणि वांगी रंगाचे असतात. वांगे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते, त्यामुळे वांग्याला तुम्ही तुमच्या डाएटमध्ये सामील करून घेतले पाहिजे. वांग्याचे आणि वांग्याच्या भाजीचे फायदे ऐकल्यानंतर तुम्ही वांग खाण्यापासून स्वतःला थांबू शकत नाही.

1. भरपूर प्रमाणात न्यूट्रिएंट्स असते :

वांग्याला न्यूट्रिएंट्सचं पावर हाऊस मानले जाते. वांग्यामध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरी उपलब्ध असतात. सोबतच वांग्यामध्ये व्हिटॅमिन्स (Vitamins), फायबर, मॅग्नेशियम, नियासिन उपलब्ध असते. ज्या व्यक्ती वांग्याचे नियमित सेवन करतात त्यांचे आरोग्य सुदृढ राहते.

2. वांगेमध्ये एंटीऑक्सीडेंट उपलब्ध आहे :

वांग्यामध्ये भरपूर प्रमाणात एंटीऑक्सीडेंट प्रॉपर्टीज उपलब्ध असतात. ज्यामुळे आपले शरीर फ्री रॅडिकलपासुन होणाऱ्या नुकसानापासून वाचवते. सोबतच अनेक गंभीर आजारांचा प्रादुर्भाव कमी होतो.

3. हृदयविकारापासून बचाव :

वांग्यामध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी असते, ज्यामुळे वजन आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत होते. सोबतच हृदयाच्या स्वास्थ्यासाठी देखील वांगी अतिशय फायदेशीर ठरतात. अशातच हार्ट अटॅक, हार्ट फेलियर, कोरोनरी आर्टरी डीजिज आणि ट्रिपल वेसल डीजिजसारख्या जीवघेण्या आजारांवर (Disease) लगाम लावण्यासाठी मदत करतात.

4. मधुमेहासाठी फायदेशीर :

मधुमेह (Diabetes) असलेल्या व्यक्तींनी आहारामध्ये वांग्याचे सेवन केले पाहिजे. वांगे हे एक रीच फायबर सोर्स आहे, ज्यामुळे डायजेशन दुरुस्त होते. फायबर उपलब्ध असल्यामुळे शुगरचे पचन चांगले आणि एब्जोर्बॅशन स्लो होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उन्हाची तीव्रता वाढल्याने जेजुरीच्या खंडेरायाला चंदन ऊटी लेप

बैठकीत विनाकारण हसणं पडलं महागात; २ पोलीस कर्मचारी निलंबित

पुष्कर घाटात भीषण अपघात! 150 फूट खोल दरीत कोसळली ३१ प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी बस

Bollywood Stories: बाप-लेकाच्या इमोशनल सीनमध्ये सनी देओल झाला व्याकुळ; शूटिंगदरम्यान सर्वांचे फुटले अश्रू

Jio Recharge: लाखो युजर्ससाठी खुशखबर! डेटा, कॉलिंग अन् बरंच काही...; Jioचा सर्वात भन्नाट रिचार्ज प्लान, किंम्मत किती?

SCROLL FOR NEXT