Viral Video
Viral Video Saam Tv
लाईफस्टाईल

viral Video : अरेच्चा ! हे काय ? नवरीच्या पाठीमागून बॉयफ्रेंड आला; भांगेत कुंकू भरलं, त्यानंतर घडलं ते...

कोमल दामुद्रे

Viral Video : लग्न (Wedding) म्हणजे पवित्र बंधन. यात दोन जोडप्यांचे मिलन नसून दोन कुटुंबाचे देखील मिलन असते. वधूच्या संमतीशिवाय कोणतेही लग्न झाले की त्यात काहीतरी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नेहमीच असते. अनेक वेळा वधूने लग्नातून पळून जाऊ नये अशी शंकाही घरच्यांना असते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये एक प्रियकर स्टेजवर येतो, वधूच्या भांगेत कुंकू भरतो आणि नंतर तिच्यासोबत पळून जातो.

हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटले नाही? या घटनेचे संपूर्ण प्रकरण काय आहे ते आता जाणून घेऊया. हा व्हिडीओ एका लग्न समारंभाचा आहे ज्यात एक माणूस, वृद्ध वराला दुसऱ्याशी बोलण्यात गुंतलेला पाहून घटनास्थळावर येतो आणि वधूसोबत पळून जातो.

मंचावर आल्यावर वधूच्या भांगेत भरला कुंकू

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लग्नाचा सोहळा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मंचावर वधू-वर बसले आहेत. वराचे वय खूप जास्त आहे, तर वधूचे वय कमी आहे. वधू मस्तक टेकून शांत बसली आहे. त्याच वेळी, वर त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या अनेक महिलांशी बोलण्यात व्यस्त आहे. यादरम्यान अशी काही घटना घडते ज्याने तुम्हाला हसू येईल.

खरं तर, जेव्हा वर दुसऱ्या स्त्रीशी बोलण्यात व्यस्त असतो, तेव्हा स्टेजच्या मागून एक पुरुष वधूच्या दिशेने चालत येतो, जो वधूचा प्रियकर असल्याचे दिसून येते आहे. त्या व्यक्तीच्या हातात कुंकू दिसत आहे. तो वधूच्या खुर्चीच्या मागे उभा राहतो आणि मागून तिला तिच्या भांगेत कुंकू लावू लागतो. पुरुष वधूची भांगेत असे 5 वेळा कुंकू भरतो.

व्हिडिओ पाहून लोक अवाक

धक्कादायक बाब म्हणजे, यादरम्यान वराला हे सर्व घडताना दिसत नाही. व्हिडीओमध्ये तुम्ही पुढे पाहू शकता की, वधूच्या भांगेत सिंदूर भरल्यानंतर तो पुरुष तिचा हात धरून तिला चालण्याचा इशारा करतो. नववधूनेही त्या व्यक्तीला ओळखले आहे असे दिसते, तीही उठते आणि दोघेही स्टेजच्या मागून शांतपणे फरार होतात. हा व्हिडिओ पाहण्यास खूपच मजेशीर आहे. हे पाहिल्यानंतर नेटकरी वेडे झाले आहेत. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर shitty.humours नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. यावर कॅप्शन लिहिले आहे - 'चक ऑन द स्पॉट'. हा व्हिडीओ मजेशीर असला तरी पाहिल्यास हसू आवरता येत नाहीये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hardik Pandya Angry: हार्दिक पंड्या लाईव्ह सामन्यात अंपायरवर भडकला! नेमकं काय घडलं?

Manoj Jarange Patil: सहानुभूतीसाठी कटकारस्थान... प्रकाश शेंडगेंच्या आरोपांवर मनोज जरांगेंचा पलटवार

Copper Ring: तांब्याची अंगठी धारण का करावी ? त्यांचे फायदे कोण कोणते ?

Today's Marathi News Live: शरद पवारांचा विश्वासू शिलेदार आज भाजपमध्ये प्रवेश करणार?

Shruti And Santanu Break Up : ४ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर श्रुती हासन आणि शांतनू हजारिकाचा ब्रेकअप?, एकमेकांना इन्स्टाग्रामवर केलं अनफॉलो

SCROLL FOR NEXT