Viral Video : कारचालकाचा निष्काळजीपणा कॅमेरात कैद, भररस्त्यात दरवाजा उघडला अन् महिलेला उडवलं; पाहा धक्कादायक व्हिडिओ

का कारचालकाने भर रस्त्यात कार लावत आरशामध्ये न बघता उघडलेला दरवाचा एका व्यक्तीला मृत्यूच्या दारात घेऊन गेल्याचं दिसतं आहे.
Bengaluru Viral Video
Bengaluru Viral VideoSaam TV
Published On

Viral Video: रस्तावरती गाडी चालवत असताना आपला निष्काळजीपणा एखाद्या व्यक्तीला किती हानिकारक ठरु शकतो. याचं उदाहरण देणारा एक व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका कारचालकाने भर रस्त्यात कार लावत आरशामध्ये न बघता उघडलेला दरवाचा एका व्यक्तीला मृत्यूच्या दारात घेऊन गेल्याचं दिसतं आहे.

हा व्हिडीओ बंगळरुमधील (Bengaluru) असून या व्हिडीओमध्ये एक कारचालक रहदारीच्या रस्त्यावर आपली कार थांबवतो आणि मागे न बघताच आपल्या कारचा दरवाचा उघडतोय. मात्र, त्याच रस्त्यावरुन मागून एक महिला स्कूटर चालवत येत होती.

पाहा व्हिडीओ -

अचानक उघडलेल्या दरवाजाला ती धडकते आणि खाली पडते त्याच वेळी मागून येणाऱ्या दुसऱ्या कारखाली ती महिला सापडल्याचं धक्कादायक दृष्य या व्हिडीओमध्ये दिसतं आहे. 24 सप्टेंबर रोजी भरदिवसा घडलेली संपुर्ण धक्कादायक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे त्यामुळे कार चालकांचा निष्काळजीपणा किती महागात पडू शकतो याचं उदाहरण आता समोर आले आहे.

सदर व्हिडिओ क्लिप सोमवारी कर्नाटक (Karnataka) राज्य रस्ता सुरक्षा प्राधिकरणाने (KSRSA) ट्विटरवर शेअर केली. मात्र, या ट्विटमध्ये ही घटना नेमकी कुठे घडली हे मात्र समजू शकलेलं नाही. शिवाय या अपघातात महिला किती जखमी झाली आहे सध्या तिची तब्येत कशी आहे आणि या कारचालकावर कारवाई करण्यात आली आहे का नाही. याबाबतची माहिती समोर आलेली नाही.

मात्र, KSRSA ने त्याच्या ट्विटर (Twitter) हँडलवरुन हा व्हिडीओ शेअर करताना सार्वजनिक रस्त्यांवरती आपल्या कारचा दरवाचा उघडण्यापुर्वी आरशांमध्ये पाहा आणि सावधानी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. तसंच रस्ता सुरक्षिततेचे नियम पाळा असं आवाहन देखील कर्नाटक राज्य रस्ता सुरक्षा प्राधिकरणातर्फे करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com