Breast Cancer Saam TV
लाईफस्टाईल

Breast Cancer : 'ही' लक्षणे दिसताच सावधान! तुम्हालाही होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर

Cancer that forms in the breast tissue : जर तुम्हाला ब्रेस्टवर किंवा काखेत तसेच आसपासच्या भागात गाठ जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रत्येक गाठ ही कर्करोगाची नसते हे खरं आहे. मात्र त्याचे निदान झाल्याशिवाय स्वस्थ राहू नका.

Ruchika Jadhav

प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानला नुकताच ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं निदान झालं आहे. भारतासह अन्य देशांत दरवर्षी अनेक महिलांना ब्रेस्ट कॅन्सरच्या समस्या उद्भवतात. यामध्ये काहींना आपला जीव देखील गमवावा लागतो. ब्रेस्ट कॅन्सर जास्तप्रमाणात महिलांमध्ये वाढत चालला आहे.

ब्रेस कॅन्सर होण्याआधी आपल्याला आरोग्याशी संबंधित काही समस्या जाणवतात. त्याकडे कही महिला दुर्लक्ष करतात. त्यामुळे आजार पुढे बाळावतो आणि त्या महिलेला ब्रेस्ट कॅन्सर होतो. त्यामुळे महिलांनी शरीरात पुढील बदल जाणवल्यास किंवा या समस्या असल्यास लगेचच त्यावर उपचार घेणे गरजेचे आहे.

स्तन गाठ

जर तुम्हाला ब्रेस्टवर किंवा काखेत तसेच आसपासच्या भागात गाठ जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रत्येक गाठ ही कर्करोगाची नसते हे खरं आहे. मात्र त्याचे निदान झाल्याशिवाय स्वस्थ राहू नका. कारण सुरुवातील कॅन्सरची गाठ होते तेव्हा ती दुखत नाही. मात्र नंतर ही गाठ हळूहळू वाढू लागली की ती दुखू लागते.

निप्पल स्त्राव

एखादी महिला नुकतीच आई झाली आहे, तर निपलमधूल दूधाचा स्त्राव होणे सामान्य गोष्ट आहे. मात्र आई होऊन काही वर्ष लोटल्यावर तुम्हाला निप्पल स्त्राव जाणवत असेल तर ही गंभीर बाब आहे. निप्पल स्त्राव सुरू झाल्यावर यातून विविध रंगाचा स्त्राव होतो. काही वेळा रक्तस्त्राव देखील होत असतो. असे होत असल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

स्तनांचा आकार बदलणे

प्रत्येक महिलेला तिच्या ब्रेस्टच्या आकाराबद्दल बरोबर माहिती असते. तर तुम्हाला ब्रेस्टचा आकार अचानक कमी किंवा जास्त जाणवला तर डॉक्टरांची भेट घ्या. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये महिलेच्या ब्रेस्टला खाज येणे, सुज येणे किंवा तेथील त्वचा लाल होणे अशा समस्या होत असतात.

या महिलांना जास्त धोका

ब्रेस्ट कॅन्सरच्या केसेस सातत्याने वाढत आहेत. अशात ज्या महिलांचे वय ४० च्या पुढे आहे, अशा महिलांच्या जीवाला याने धोका असतो. २४ वर्षांच्या तरुणींना या समस्या जाणवत नाहीत. तर २९ वर्षांच्या महिलांना या बाबत काळजी आणि हेल्थ चेकअप केले पाहिजे.

टीप : ही सामान्य माहिती आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

SCROLL FOR NEXT