Breast Cancer Awareness Month Saam Tv
लाईफस्टाईल

Breast Cancer Awareness Month: ब्रेस्ट कॅन्सर कसा होतो? याची लक्षणे कोणती? जाणून घ्या

Breast Cancer Symptoms: गेल्या काही वर्षात स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Breast Cancer Care :

स्तनाचा कर्करोग हा आजार अनेक महिलांना होतो. या आजाराबाबत सर्वांमध्ये मोठ्या प्रमाणात जागरुकता नाहीये. त्यामुळे स्त्रियांना हा आजार काय आहे? याची काळजी कशी घ्यावी हे माहिती नसते.. त्याचसाठी जागतिक स्तरावर १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर हा महिना स्तन कर्करोग जागरुकता महिना (Breast Cancer Awareness Month)म्हणून साजरा केला जातो.

गेल्या काही वर्षात स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दरवर्षी शेकडो महिलांना या आजाराचे निदान होते. या आजाराचे योग्य वेळी निदान होणे आणि त्यावर उपचार घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कर्करोगात अनेकदा आजाराचे निदान वेळेवर न झाल्यास आणि कर्करोग तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात असल्यास उपचार घेणे अशक्य होते. त्यासाठी निदान होणे महत्त्वाचे आहे.

स्तन कर्करोगाची लक्षणे

स्तन कर्करोगाची लक्षणे सुरुवातीपासूनच ओळखणे गरजेचे आहे.

जळजळ होणे

स्तानांमध्ये जळजळ ही अनेक कारणांनी होऊ शकते. परंतु कधीकधी हे स्तनाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. त्यावेळी, खाज येणे, लाल पुरळ येणे हीदेखील स्तन कर्करोगाची लक्षणे असू शकतात.

गाठ येणे

तज्ज्ञांच्या मते, स्तानाच्या कर्करोगाची सुरुवात ही गाठ येण्यापासून होते. स्तानात गाठ आल्यास हे कर्करोगाचे लक्षण असू शकते. त्यामुळे जर गाठ आली असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा आणि त्यांचा सल्ला घ्या.

स्तनात वेदना होणे

स्तनात वेदना होणे हे लक्षण दुर्लक्ष करण्यासारखे नाही आहे. स्तनाला स्पर्श केल्यावर तुम्हाला वेदना जाणवत असेल किंवा अस्वस्थ वाटत असेल तर हे स्तानाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करा.

स्तन कर्करोगाची तपासणी

वीस वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांनी नियमितपणे या आजाराची चाचणी करावी. महिलांना मासिक पाळीनंतर २ ते ५ दिवसांनी स्तन तपासणी करण्याची आवश्यकता असते. मासिक पाळीत दुखणे आणि सूज येणे ही सामान्य गोष्ट आहे. ज्या महिलांना पाळी येत नाही. त्यांनी दर महिन्याला ही चाचणी करावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT