प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात एकदा तरी प्रेमात पडतो. प्रेमात पडल्याप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी ब्रेकअप होतं. ब्रेकअप झाल्यानंतर ज्या पार्टनरबरोबर आपण इतके दिवस चांगले क्षण घालवले त्यापासून आपण दूर जातो. पार्टनरपासून दूर गेल्यावर आपल्या मनात सतत जुन्या आठवणी फिरत राहतात. त्यामुळे एक्सला विसण्यासाठी व्यक्ती मुव्ह ऑन करतात.
नातं संपवताना फक्त ब्रेकअप पुरेसं नसतं. त्यासह ब्रेकओवर सुद्धा महत्वाचा असतो. ब्रेकओवर म्हणजे तुमच्या आधीच्या नात्याला पूर्णता संपवणे. काही व्यक्तींच्या आयुष्यातून दूर गेलेल्या पार्टनरच्या आठवणीत रडत बसतात. त्यांना यातून बाहेर पडणे फार कठीण होतं. त्यामुळे ब्रोकओवर फार गरजेचं आहे.
प्रेमात अपयश आल्यावर अशावेळी आपल्याला प्रेम रोग झाल्यासारखे वाटते. मन नाराज असल्याने कोणत्याच गोष्टीत मन रमत नाही. सतत पार्टनरची आठवण येते. यामुळे आपल्या तब्येतीवर आपलं लक्ष राहत नाही. व्यक्ती वाटेल ते खातात तसेच जास्त वेळ तर अन्न खातच नाहीत. त्यामुळे अशक्तपना वाढतो. यामुळे अशक्तपना जास्त होऊन एखादा गंभीर आजार जडण्याची देखील शक्यता असते.
पार्टनरबरोबर प्रत्येक जण फिरतो. मात्र ब्रेकअप झाल्यावर कुठेही फिरावं वाटत नाही. कोणत्याही गोष्टीसाठी मन करत नाही. अशावेळी तुम्ही स्वत:च मन बदलण्यासाठी सोलो ट्रिपला गेलं पाहिजे. सोलो ट्रिपच्या प्लॅनींगमध्ये व्यस्त झाल्यावर आणि तिकडे गेल्यावर तुम्ही स्वत:च एक्सला विसरून जाल.
रिलेशनशिपमध्ये असताना आपण कायम आपल्या पार्टनरचा विचार करतो. त्याच्या आवडी निवडी जपत सेवींग करतो. अनेकदा आपण स्वत:साठी काही घेत नाही मात्र पार्टनरसाठी काही ना काही खरेदी करतो. त्यामुळे तुम्ही नवीन आयुष्याला सुरुवात करताना स्वत:साठी शॉपिंग केली पाहिजे. यात नवीन हेअर कटसह विविध वस्तू खरेदी केल्या पाहिजेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.